farmer sakal
महाराष्ट्र बातम्या

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान! बचत खात्यात जमा होणार रक्कम

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने तालुकानिहाय लेखापरीक्षण करून २०१८-१९ ते २०१९-२० या तीन वर्षांतील किमान दोन वर्षे कर्जाची परतफेड करणाऱ्यांची यादी तयार केली आहे. २०१९मधील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ९४४ शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार असून, त्या शेतकऱ्यांचीही नावे यादीत समाविष्ट केली आहेत. जिल्हा बॅंकेचे साधारणत: ४१ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरतील, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

अनुत्पादित कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅंकेला कर्जमाफीतून उभारी मिळाली आहे. शेतकऱ्यांकडील कर्जाची थकबाकी त्यातून वसूल झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्याचा जिल्ह्यातील जवळपास १२ ते १५ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षांत दोनवेळा कर्जाची नियमित परतफेड केली असल्यास त्या शेतकऱ्यास प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. पण, आजी-माजी आमदार, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, शासकीय कर्मचारी (मासिक वेतन २५ हजारांपेक्षा अधिक, चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून), महावितरण, एसटी महामंडळ व अनुदानित संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्तिवेतनधारक (माजी सैनिक वगळून ज्यांचे मासिक निवृत्तिवेतन २५ हजारांपेक्षा अधिक), कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी व जिल्हा बॅंका, सहकारी दूध संघाचे अधिकारी व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ) यांना या अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

दिवाळीपूर्वी बचत खात्यात जमा होणार अनुदान

अतिवृष्टी, अवकाळी, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. आता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. बॅंकांनी ही रक्कम कर्जापोटी जमा करून घेऊ नये म्हणून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे बचत खाते नंबरदेखील बॅंकांकडून घेतले जात आहेत. दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

५ सप्टेंबरला आधार लिंक नसलेल्यांची यादी

प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी ३८ मुद्द्यांच्या आधारावर अंतिम केली आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार लिंक केलेले नाही, त्यांची यादी ५ सप्टेंबरला बॅंकांसह गावोगावच्या शाखांमध्ये लावली जाणार आहे. त्या शेतकऱ्यांचे आधार लिंक केले जाईल. त्यानंतर अंतिम यादी शासनाला सादर होऊन पात्र लाभार्थींना अनुदान वितरीत होईल, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT