mumbai news esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Crime : पत्नी शिडीवरुन पडल्याचा बनाव; पतीनेच केली गळा आवळून हत्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईतील धारावी परिसरात 28 वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे.

माहिमच्या शाहू नगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मोहम्मद अन्वर मोहम्मद अकबर शेख असे आरोपी पतीचे नाव असून पत्नी परवीन शेख व नऊ वर्षांच्या मुलीसोबत धारावी येथील पेरियार नगरमध्ये राहत होता.

शेखची मुलगी गुरुवारी शिकवणीसाठी गेली होती. दुपारी घरी परतल्यानंतर परवीन जमिनीवर पडल्याचे तिच्या दृष्टीस पडले. परवीनच्या चेहऱ्यावर रूमाल व गळ्यावर एक स्कार्प होता. वडिलांकडे विचारणा केली असता आई शिडीवरून पडल्याचे शेखने तिला सांगितले.

आरोपी पतीने त्यानंतर पत्नीला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून महिलेला मृत घोषित केले.

महिलेच्या गळ्यावर, गालावर व चेहऱ्यावर रक्त होते. त्यामुळे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. परवीनच्या गळ्यावर यू मार्क असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पोलिसांनी परवीनची बहिण अंगुरीखातून हिच्याकडे चौकशी केली.

पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. त्यातून शेखने परवीनची हत्या केल्याची शंका अंगुरीखातूने व्यक्त केली. तिचा जबाब नोंदवून शाहू नगर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि आरोपी शेखला शुक्रवारी रात्री अटक केली.

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून पोलीस परवीनच्या शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT