state government decided to declare public holiday on Dahi Handi mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

दहिहंडी आता क्रीडा प्रकारात, गोविंदांना मिळणार शासकीय लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतयाबाबत घोषणा केली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दहिहंडीचा आता क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच या खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये गोविंदांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. (Inclusion of Dahihandi in sports Govinda will get govt benefits CM announcement In Vidhan Sabha)

मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. ते म्हणाले, दहिहंडीवेळी जर एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर त्याला शासनाकडून १० लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जर एखादा गोविंदा जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये, अपघातात अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.

दहिहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात करण्यात यावा अशी सर्वच गोविंदांची मागणी होती. म्हणून या गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन 'प्रो गोविंदा' स्पर्धा राबवाव्यात. तसेच या स्पर्धा राज्य शासनाकडून राबवण्यात येतील. या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम शासनाकडून मिळेल. त्याचबरोबर इतर खेळांप्रमाणं या गोविंदांदेखील शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के कोट्याचा लाभ घेता येईल. तसेच इतर सुविधांचाही लाभ घेता येईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

पुढील वर्षीपासून भरणार 'प्रो गोविंदा' स्पर्धा

स्पेन, चीन सारख्या देशात पिरॅमिड म्हणून या खेळाचा समावेश आहे. तसेच आपले पारंपारिक खेळ कबड्डी, खो-खो, कुस्ती यांसारख्या खेळांना शासनानं क्रिडा प्रकारात समावेश केला आहे, त्याप्रमाण पुढील वर्षापासून 'प्रो गोविंदा' स्पर्धा घेण्यात येतील. हजारो गोविंदा आपला हा उत्सव मोठा करतात. यामध्ये कोणाला काही सुचवायचं असेल तर त्यावरही आपण विचार करु. आत्ता आपण सुरुवात केली आहे, चांगली सुरुवात आहे याचं सर्वांनी स्वागत करावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT