anil parab
anil parab esakal
महाराष्ट्र

आयकरच्या रडारवर अनिल परब; निकटवर्तीयाच्या 26 मालमत्तेवर छापे

सकाळ डिजिटल टीम

पुणे, सांगली, बारामतीसह अनेक ठिकाणी संबंधितांनी मोक्याच्या जागी गेल्या दहा वर्षात मालमत्ता जमवली आहे.

प्राप्तिकर विभागाने राज्यातील २६ ठिकाणांवर शोध मोहिम राबवली होती. ८ मार्च रोजी मुंबईतील केबल ऑपरेटर्स, राज्य सरकारी कर्मचारी आणि व्यावसायिकांशी संबंधितांच्या ठिकाणांवर छापे टाकले गेले. यामध्ये मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या मालमत्तेवर छापा टाकला गेला. एकूण २६ ठिकाणी केलेल्या या शोधमोहिमेत जवळपास ६६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. २६ ठिकाणांमध्ये मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीचा समावेश आहे. यामध्ये दापोलित एका बड्या राजकीय व्यक्तीने २०१७ मध्ये जमिन खरेदी केली होती ज्याची किंमत अंदाजे १ कोटी इतकी आहे. मात्र त्याचे रजिस्ट्रेशन २०१९ मध्ये करण्यात आले.

पुणे, सांगली, बारामतीसह अनेक ठिकाणी संबंधितांनी मोक्याच्या जागी गेल्या दहा वर्षात मालमत्ता जमवली आहे. कुटुंबाच्या मालकीचा एक बंगला आणि फार्महाऊस पुण्यात आले. तर आलिशान असं फार्महाऊस तासगावमध्ये आहे. सांगलीत दोन बंगले, दोन व्यावसायिक कॉम्प्लेक्सचासुद्धा समावेश आहे. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच फ्लॅट आहेत. तर एक फ्लॅट नवी मुंबईत आहे. तसंच सांगली, बारामती, पुण्यात रिकामे प्लॉट आहेत. तसंच १०० एकरहून अधिक शेतजमीन गेल्या ७ वर्षात संबंधित व्यक्तीने खरेदी केल्याची माहिती प्राप्तीकर विभागाने दिलीय.

27 कोटी रुपयांच्या बोगस खरेदीद्वारे कराराच्या खर्चात वाढ दर्शवली असल्याल्याचा पुरावा प्राप्तिकर विभागाला मिळाला आहे. तसेच बारामतीतील जमीन विक्री संदर्भात 2 कोटी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावतीचा पुरावा सुद्धा प्राप्तिकर विभागाच्या हाती लागला आहे. प्राप्तीकर विभागाने केलेल्या शोधमोहिमेत डिजिटल डेटा आणि कागदपत्रे आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहेत. सध्या या पुराव्यांचे विश्लेषण केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT