Raid on Pradeep Sharma 
महाराष्ट्र बातम्या

Raid on Pradeep Sharma: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा, काय आहे प्रकरण?

Raid on Pradeep Sharma: आयकर विभागाच्या तपास शाखेने गुरुवारी सकाळी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानाची झडती घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Raid on Pradeep Sharma: मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर गुरूवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी कारवाई केली.   करचुकवेगिरी केल्या प्रकरणी अंधेरी भागातील प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानाची आयकर विभागाने झडती घेतली. प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती

प्रकरण थोडक्यात-


एका माजी आमदार आणि खासदार रमेश दुबे यांच्याशी संबंधित तपासाचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला. माजी आमदारावर मोठ्या प्रमाणात करचोरी आणि बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे. शर्मा हे काही राजकारणी आणि उद्योजकांसोबत जोडलेले आहेत, त्यांचीही करचुकवेगिरीप्रकरणी चौकशी सुरू आहे.सगळी मालमत्तेची पडताळणी केली गेली  त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आहे का याचा तपास आयकर विभाग करत आहे. (Latest Marathi News)

आमदार कनेक्शन-


शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्याबरोबरच  अधिकाऱ्यांनी माजी खासदार रमेश दुबे आणि त्यांच्या बांधकाम व्यावसायिक मुलाच्या निवासस्थानाचीही झडती घेतली. रमेश दुबे हे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी खासदार आहेत.गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून जमीन हडप केल्याप्रकरणी दुबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी असलेले दुबे, त्याचा चालक हरी प्रसाद आणि भदोही तहसीलचे माजी उपनिबंधक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pradeep Sharma News in Marathi)

शर्मावर कारवाई-


25 फेब्रुवारी 2021 रोजी जिलेटिनने भरलेली एक चारचाकी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ सापडली होती. त्यानंतर 5 मार्च रोजी या चारचाकीचा मालक मनसुख हिरेनचां ठाण्याच्या खाडीत मृतदेह मिळाला. या प्रकरणी एनआयएने तपास केला. तपासादरम्यान जून 2021 मध्ये प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेचाही हात असल्याचं समोर आलं होतं. (Who is Pradeep Sharma)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT