15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वतंत्र्य मिळाले.  solapur
महाराष्ट्र बातम्या

स्वातंत्र्य दिन विशेष! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सोलापुरातील ‘ही’ ५८ गावे होती पारतंत्र्यात; १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत हैदराबाद संस्थानात भोगला रझाकारांचा जाच

देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तरीही काही भाग हैदराबादच्या निजामाने ताब्यात ठेवला होता. यात सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांसह मराठवाड्यातील आठ जिल्हे रझाकारांची जुलमी राजवट भोगत होते. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद मुक्ती होईपर्यंत या ५८ गावांनी पारतंत्र्य भोगले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तरीही काही भाग हैदराबादच्या निजामाने ताब्यात ठेवला होता. यात सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांसह मराठवाड्यातील आठ जिल्हे रझाकारांची जुलमी राजवट भोगत होते. १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद मुक्ती होईपर्यंत या ५८ गावांनी पारतंत्र्य भोगले आहे.

स्वातंत्र्यानंतरही हैदराबादचा निजाम स्वतंत्र भारतात स्वत:चे अस्तित्व वेगळे राखण्याचे स्वप्न पाहत होता. यासाठी कासीम रझवी नावाच्या निजामाच्या दिवाणाने रझाकार नावाची स्वतंत्र संघटना स्थापन करून जनतेचा अमानुष छळ केला. यामुळे या रझाकराविरुद्ध या ५८ गावांनी मोठा प्रतिकार करत स्वत:ची फौजही तयार केली होती.

देश स्वतंत्र झाला तरही दुसरीकडे जिल्ह्याचा एक भाग मात्र स्वातंत्र्यानंतरही एक वर्षे झगडत होता. १७ सप्टेंबर १९४८ ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या धाडसी निर्णयामुळे ‘पोलिस ॲक्शन’ द्वारे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि ही ५८ गावे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली.

निजामशाहीतील ५८ गावे

- बार्शी तालुका : शेलगाव, श्रीपतपिंपरी, मानेगाव (थो.) भोईंजे, शेंद्री, वांगरवाडी, इर्ले, राऊळगाव, मुंगशी (वा.) सासुरे, तावरवाडी, बोरगाव.

- माढा तालुका : अंजनगाव (उ), जामगाव, केवड, चव्हाणवाडी, हटकरवाडी, कापसेवाडी, धानोरे, बुद्रूकवाडी, पंचपूलवाडी, खैराव, रिधोरे, उपळाई, सुलतानपूर.

- मोहोळ तालुका : आष्टे, पोफळी, विरवडे (खु) चिखली, यल्लमवाडी, पवारवाडी, बोपले, एकुरके, मनगोळी, भैरेवाडी, वाळूज, देगाव, घोरपडी, डिकसळ, खुनेश्वर, भोयरे, मसले-चौधरी. - उत्तर सोलापूर तालुका : भागाईवाडी, कौठाळी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, वांगी, इंचगाव, रानमसले, बीबीदारफळ, शिवणी, नान्नज, मोहितेवाडी, गरलाचीवाडी (हे गाव नेमके कोणते या उल्लेख अद्याप स्पष्ट झालेला नाही)

- दक्षिण सोलापूर तालुका : वरळेगाव.

(माहिती प्रा. सतीश कदम यांच्या संशोधनानुसार)

१७ सप्टेंबर हा दिवस देखील स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होणे आवश्यक

१५ ऑगस्टनंतर १९४७ नंतर निजामाची सत्ता खिळखिळी झाली असली तरी एक १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत हैदराबाद संस्थान मुक्त झाले नव्हते. यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यात असलेल्या आणि मुळात मराठवाड्यात असलेल्या ५८ गावांमध्येही १५ ऑगस्टबरोबरच १७ सप्टेंबर हा दिवस देखील स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होणे आवश्यक आहे. तसा प्रशासकीय आदेश सोलापूर जिल्ह्यातील वरील ५८ गावांकरिता निघणे आवश्यक आहे. मराठवाडा मुक्तीदिनाची सुट्टी देऊन या दिवशीही ध्वजवंदन होणे आवश्यक आहे.

- डॉ सतीश कदम, हैदराबाद मुक्तिसंग्रमाचे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : स्वातंत्र्य दिनीच मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Updates : पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलन

'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत

Independance Day Photos : 15 ऑगस्ट 1947 ला कसा साजरा झालेला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन? 10 फोटो पाहून म्हणाल, हिंदुस्थान ज़िंदाबाद!

Maharashtra Government : जमीन मोजणीला मिळणार गती; भूमी अभिलेख विभागाला १२०० रोव्हर खरेदीस मान्यता

SCROLL FOR NEXT