INDIA Alliance Mumbai Meeting Rahul Gandhi esakal
महाराष्ट्र बातम्या

INDIA Alliance : महाराष्ट्रात पाऊल ठेवताच राहुल गांधी प्रतापगडाला देणार भेट? काँग्रेसच्या सरचिटणीसांनी दिली महत्वाची अपडेट

सातारा जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार

सकाळ डिजिटल टीम

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबरला होत आहे. बैठकीचे प्रमुख आकर्षण युवकांचे आयडॉल व खासदार राहुल गांधी आहेत.

सातारा : मुंबई येथे इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीला काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे एक हजार कार्यकर्ते जाणार आहेत.

यावेळी राहुल गांधी यांना प्रतापगड भेटीचे निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली. देसाई यांनी सांगितले, की केंद्रातील जुलमी सरकार उलथवून टाकण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे.

या आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबरला होत आहे. बैठकीचे प्रमुख आकर्षण युवकांचे आयडॉल व खासदार राहुल गांधी आहेत. त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र काँग्रेस सज्ज झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी राज्यातून लाखो कार्यकर्ते येणार असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. या वेळी युवा नेते प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील- उंडाळकर, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, कऱ्हाड दक्षिणचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, निवास थोरात, बाबासाहेब माने, संदीप चव्हाण, अभिजित पाटील.

तसेच ॲड. श्रीकांत चव्हाण, ॲड. दत्तात्रय धनावडे, संदीप माने, जगन्नाथ कुंभार, रजनी पवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांना जिल्ह्यातील प्रतापगड भेटीचे निमंत्रण दिले जाणार असून, प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यामुळे राहुल गांधी यांना प्रतापगड भेटीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने आग्रह करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT