India loses 750 tigers in last eight years says NTCA 
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! महाराष्ट्रात आठ वर्षात "एवढ्या' वाघांचा मृत्यू

सुस्मिता वडतिले

जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. जगातील अनेक भागातून वाघांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. देशात 2012 ते 2018 पर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेला सर्वाधिक वाघांचा मृत्यू झालेले राज्य म्हणजे मध्यप्रदेश तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.

देशातील टॉप टेनमध्ये मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, तमिळनाडू, आसाम, केरळ, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांत वाघांच्या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार देशात आठ वर्षांत 168 वाघांची शिकार करण्यात आली आहे. म्हणजेच शिकार तसेच अन्य कारणांमुळे देशात आठ वर्षांत 750 वाघांचा मृत्यू झाला आहे. 
चार दिवसांपूर्वी केरळमधील पलक्कड जिल्ह्यातल्या मन्नारकड भागात एक हत्तीण आपल्या पोटात असलेल्या चिमकुल्या जीवासाठी अन्नाच्या शोधात जंगलातून फिरताना वस्तीमधील माणसांनी फटाक्‍यांनी भरलेलं अननस खायला घातल्यानं मृत्युमुखी पडली. आपल्या देशात अशा पद्धतीने अनेक प्राण्यांची शिकार केली जाते. या प्राण्यांचा काहीच दोष नसताना त्यांना मृत्यूशी सामना करावा लागतो. अशातच देशात आठ वर्षांमध्ये वाघांच्या मृत्यूच्या प्रकरणात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. 
देशात 2012 ते 2018 नुसार वाघांच्या मृत्यूंची राज्यनिहाय आकडेवारी 

राज्य नैसर्गिक अनैसर्गिक शिकार  छाननी अंतर्गत शिकार जप्त केलेले  एकूण
मध्यप्रदेश 94 6 19 38 16 173
महाराष्ट्र 64 13 10 28 10 168
कर्नाटक 65 3 5 28 10 111
उत्तराखंड 40 10 13 14 11 88
तमिळनाडू 30 4 5 11 4 54
आसाम 20 1 3 17 13 54
केरळ  25 1 0 6 3 35
उत्तरप्रदेश 8 2 7 12 6 35
राजस्थान  7 0 6 3 1 17
बिहार  5 1 1 2 2 11
छत्तीसगढ  0 0 0 0 10 10
पश्‍चिम बंगाल 6 0 0 2 3 11
ओडिशा 3 0 0 2 2 7
आंध्रप्रदेश 2 1 0 2 2 7
तेलंगणा 0 0 0 1 4 5
दिल्ली 0 0 0 0 2 2
नागालँड 0 0 0 1 1 2
अरुणाचल प्रदेश 0 0 0 1 0 1
हरियाणा 0 0 0 0 1 1
गुजरात 0 0 1 0 0 1
एकूण 369 42 70 168 101 750

स्रोत- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)

जगातील एकूण वाघांपैकी 70 टक्के वाघ भारतात आहेत. 2018 च्या आकडेवारीनुसार भारतात दोन हजार 967 वाघ आहेत. देशात वाघांच्या संरक्षणासाठी सरकारकडून मोहीम राबवली जात आहे. वाघांच्या संख्येत वाढ होऊनही तितक्‍याच प्रमाणात वाघांच्या मृत्यूंची आकडेवारी मोठी आहे. एनटीपीसीने दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षांत मध्य प्रदेशात सर्वाधिक 173 वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 38 वाघांचा शिकार झाल्यामुळे तर 94 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. तसेच बाकी 19 वाघांचा मृत्यूचा तपास सुरू असून 16 अवशेष सापडले आहेत. 
वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्य साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने गरजेचे आहे. 

देशात 2012 ते 2019 नुसार वाघांच्या मृत्यूंची आकडेवारी 

राज्य नैसर्गिक अनैसर्गिक शिकार  छाननी अंतर्गत शिकार जप्त केलेले  एकूण
2012 42 7 0 23 16 88
2013 32 3 0 29 4 68
2014 45 8 0 13 12 78
2015 54 5 0 13 10 82
2016 66 0 8 25 22 121
2017 57 5 14 24 17 117
2018 45 4 15 27 10 101
2019 28 2 41 14 10 95
एकूण  369 42 70 168 101 750

स्रोत- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)
 
सध्या देशात 50 हून अधिक व्याघ्र प्रकल्प कार्यरत असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या सहा आहे. वाघांची संख्या पाहता ती नगण्यच आहे. अनेक ठिकाणी वाघांची शिकार केली जाते. या शिकारीच्या प्रकारामुळे वाघ नामशेष होताना दिसून येत आहेत. वाघांची शिकार आणि मृत्यूंची संख्या वाढली आहे. यामुळे वाघाचे संवर्धन हे पर्यावरणाचे संवर्धनच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT