Plea Against Sanjay Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

राऊतांना न्यायव्यवस्थेवरील टीका भोवणार? बार असोसिएशनची अवमान याचिका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : न्यायालयाने किरीट सोमय्यांना दिलासा दिल्यानंतर संजय राऊतांनी (Sanjay Raut) न्यायव्यवस्थेवर टीका केली होती. आता राऊतांना हीच टीका भोवण्याची शक्यता आहे. इंडियन बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) संजय राऊतांविरोधात अवमान याचिका (Plea Against Sanjay Raut) दाखल केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही नोटीस बजावण्याची मागणी केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. त्यावेळी न्यायालय भाजप नेत्यांना झुकतं माप देत असल्याची टीका संजय राऊतांनी केली होती. भाजपच्या नेत्यांना लवकरच दिलासा मिळतो. न्यायव्यवस्थेत दिलासा देण्यासाठी भाजपचे लोक बसविण्यात आले आहेत का? की न्यायव्यवस्थेतील लोकांना कुठला फायदा मिळतो? महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलासा का मिळत नाही? असे सवाल संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर उपस्थित केले होते. त्यानंतर आता इंडियन बार असोसिएशनने संजय राऊतांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

किरीट सोमय्या आणि भाजप नेत्यांना झुकतं माप देत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. हे चुकीचे असल्याचा दावा बार असोसिएशनने केला आहे. न्यायव्यवस्थेवर टीका-टीपण्णी करणे योग्य नाही. संजय राऊत खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायव्यवस्थेबाबत बोलताना सांभाळून बोलावं, असं याचिकेत म्हटलं आहे. इतकेच नाहीतर सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनाही नोटीस बजावून स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी बार असोसिएशनने याचिकेतून केली आहे. ही याचिका लवकरच सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालय काय भूमिका घेतेय? हे पाहणे महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT