India’s First Double-Decker Bus esakal
महाराष्ट्र बातम्या

India’s First Double-Decker Bus: एका तरूणाच्या उपोषणामूळे केरळमध्ये आली पहिली बस; महाराजच होते पहिले प्रवासी!

सकाळ डिजिटल टीम

त्रावणकोर, कोचीन आणि मलबार या तीन संस्थानांचे विलीनीकरण करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी केरळ राज्याची स्थापना करण्यात आली. केरळवर अनेक राजा महाराजांनी राज्य केले. त्यावेळी फक्त राजघराण्यातील लोकांकडे मोटार गाडी होती. सर्वसामान्यांना कुठेतरी पायी किंवा बैलगाडीनेच जावे लागे. 1910 मध्ये येथे पहिली बससेवा सुरू झाली. या बससेवेच्या सुरुवातीचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. 

त्या घटनेपासूनच प्रेरणा घेत त्रावणकोरचे महाराजा चिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांनी 1938 मध्ये राज्यात सर्वात पहिली सार्वजनिक रस्ता परिवहन सेवा सुरू केली. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) ची स्थापना 15 मार्च 1965 रोजी 1950 मध्ये लागू झालेल्या रस्ते वाहतूक महामंडळ कायद्यानंतर झाली होती. 1965 मध्ये परिवहन विभाग स्वायत्त महामंडळ बनले.

केरळमध्ये 20 फेब्रूवारी 1938 रोजी देशातली पहिली डबल डेकर बस सुरू झाली. तिथले लोक आजही अभिमानाने सांगतात की, डबल डेकर बस असलेले केरळ हे पहिले राज्य आहे. तेव्हा महाराजांच्या संपूर्ण कुटुंबियच पहिले प्रवासी होते.

केरळमध्ये पहिली बस सेवा आणण्याची कहाणी एका 16 वर्षाच्या मुलाशी आणि त्याच्या उपोषणाशी संबंधित आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला जोसेफ ऑगस्टी कायलाकाकोम या 16 वर्षीय तरूणाच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तो पलाई येथील काका ऑगस्टी मथाई कायलाकाकोम यांच्याकडे राहायला गेला होता. जोसेफ तेव्हा 16 वर्षांचा होता. त्याकाळात या नुकतेच वयात आलेली मुले काम करू शकत होतीत. त्यांच्यावर वयाचे बंधन नव्हते.

जोसेफनेही आपल्या भावाप्रमाणे (थॉमस) आपल्या काकांचा कपड्यांचा व्यवसाय करायला सुरुवात केली. व्यवसायाच्यासाठी त्यांला अनेक मैल पायी किंवा बोटीने प्रवास करावा लागला. दुर्गम भागातून कापड गोळा करण्याचे त्यांचे काम होते. अशाच एका प्रवासाला निघताना त्यांनी प्रवाशांच्या त्रासाचा विचार केला. जोसेफने विचार केला की, चालत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक बस सेवा सुरू करावी. ही बस चालवण्याची कल्पना त्याने काकांकडे बोलून दाखवली.

त्याच्या काकांनी आजवर केलेल्या कामातून त्याने 1000 सॉरवेन वाचवले होते. हि रक्कम एवढी होती की, त्याकाळात ते 3000 एकर जमीन विकत घेऊ शकत होते. त्यामूळे त्यांनी बस घेण्यासाठी हे पैसे खर्च करायला नकार दिला. यानंतर जोसेफने घरीच उपोषण करण्याची घोषणा केली. कारण त्याला सुचलेला हा बसचा व्यवयास नक्कीच चालेल असा विश्वास त्याला होता. त्याचा निश्चय ठाम होता त्यामुळे जोसेफने कडक उपोषण केले. हे पाहून त्याच्या काकीलाही वाईट वाटले आणि त्यांनी पतीला जोसेफच्या बसमध्ये पैसे गुंतवायला लावले.

अशाप्रकारे 1910 मध्ये केरळमध्ये पहिली बस आली. या बससोबत असलेले जोसेफचे छायाचित्र आजही त्यांच्या कुटुंबासोबत आहे. यामध्ये जोसेफ एका पायलटप्रमाणे आत्मविश्वासाने दिसत आहे. ऑगस्टी मथाई यांचा नातू जेकब झेवियर कायलाकाकोम सांगतात की, जेव्हा माझे आजोबा हि बस घेऊन आले होते. तेव्हा ती पाहण्यासाठी लोक खूप लांबून आले होते. बस धावायला लागली की, आधी लोक तिला हात लावून बघायचे. मग त्यामध्ये चढायचे.

या बससेवेला मीनाचिल मोटर असोसिएशन असे नाव दिले होते. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम दरम्यान बस प्रवास फर्मात सुरू होता. पण, पहिले महायुद्ध झाले आणि बस तोट्यात आली. बसमध्ये बिघाड झाला तेव्हा तिचे पार्टही मिळत नव्हते. त्यामुळे ही बस बंद करावी लागली. पण, कालांतराने परत ती महाराजा चिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांनी सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT