India’s First Mini Car esakal
महाराष्ट्र बातम्या

India’s First Mini Car : टाटांनी नाही तर या मराठी माणसाने बनवलेली देशातली पहिली मिनी कार; फक्त 12 हजार होती किंमत

आपला भारत देश हा जगातल्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मार्केटपैकी एक

सकाळ डिजिटल टीम

India’s First Mini Car : आपण जर साधा विचार केला की सर्वात छोटी फोर व्हीलर कोणती? तर डोळ्या समोर उभी राहते ती नॅनो कार. तुम्ही या कारबद्दल ऐकले असेलच आणि तिला बघितलही असेल. पण तुम्हाला माहित आहे का की नॅनोसारखी मिनीकार ७३ वर्षांपूर्वी भारतात तयार झाली होती. ही कार सर्वसामान्य माणसांना परवडेल अशाच उद्दिष्टाने तयार केली होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कारची किंमत फक्त 12 हजार रुपये होती.

आपला भारत देश हा जगातल्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मार्केट पैकी एक आहे. भारतात बनवलेल्या अनेक वाहनांना जगभरात मागणी आहे. आजकाल एकामागून एक आलिशान आणि अत्याधुनिक गाड्या बनवल्या जातात. पण तब्बल 73 वर्षांपूर्वी देशात पहिली मिनी कार बनवली गेलेली आणि गंमत म्हणजे तीच नावही विलक्षण आहे; ‘मीरा मिनी कार’.

काही वर्षांपूर्वी टाटाने सर्वसामान्य माणसांच बजेट लक्षात घेऊन नॅनो कार बाजारात आणली तेव्हा ती खूप लोकप्रिय झाली. पण तरीही 73 वर्षांपूर्वी नॅनो कार बनवली गेली. ही बाब 1975 साली लोकांसमोर आली होती. या कारची किंमत फक्त 12 हजार रुपये ठेवण्यात आली होती.

73 वर्षांपूर्वी तयार केलेला नमुना

भारतातील सामान्य माणसानेही गाडीतून प्रवास करावा, असे स्वप्न शंकरराव कुलकर्णी या मराठमोळ्या माणसाने बघितले. त्यांनी छोट्या बजेटची कार बनवण्याचा निर्णय घेतला. कुलकर्णी यांनी 1949 साली या कारचा प्रोटोटाइपही तयार केला होता. या प्रोटोटाइपमध्ये त्यांनी गरजेनुसार अनेक बदल केले.

सुमारे 20 वर्ष एक्सपिरमेन्ट आणि इंजिनमध्ये सुधारणा केल्यानंतर ही कार 1970 मध्ये लोकांसमोर आली. त्यांनी या गाडीला ‘मिनी मीरा’ असे नाव दिले आणि आरटीओकडून दोन सीटर मॉडेल पास करून घेतले. आरटीओने मीराला MHK1906 हा रजिस्ट्रेशन नंबर दिला होता.

फक्त 7 वी पास होते कुलकर्णी

ही कार टाटाच्या नॅनो कारपेक्षाही लहान होती. या मॉडेलला MHE192 क्रमांक मिळाला. गंमत म्हणजे कार बनवणारे शंकरराव कुलकर्णी हे फक्त ७वी पर्यंतच शिकले होते. पण त्यांना गाड्यांची आणि इंजिनची भरपूर माहिती होती. याचा वापर करून त्यांनी मीराला घडवल. सुरुवातीला दोन सीटर कार नंतर 5 सीटर म्हणून डिझाइन करण्यात आली. त्या काळातील मीरा आणि आजच्या नॅनोमध्ये बरेच साम्य आहे. नॅनोप्रमाणेच मीरा कारमध्ये सिंगल वायपर, मागील इंजिन, जवळपास समान मायलेज आणि 5 सीटर क्षमता होती.

या कंपनीमुळे झालेला प्रकल्प अयशस्वी

कुलकर्णी यांनी सर्वसामान्यांसाठी केलेली गाडी यशस्वी होऊ शकली नाही. याला तत्कालीन नोकरशाही जबाबदार होती. खरतर कुलकर्णी यांना कारसाठी बिझनेस युनिट सुरू करायच होत, पण त्यासाठी सरकारची परवानगी हवी होती. मात्र या कामाला सतत पुढे ढकलल जात होत. यानंतर मीराच्या गाडीने कुलकर्णी मुंबईला पोहोचले. त्यांनी गेटवे ऑफ इंडिया इथे त्याचे प्रदर्शन केले. ही गाडी पाहून लोकांचे लक्ष त्याकडे वेधले जाऊ लागले.

यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेने कार तयार करण्यासाठी प्लांट उभारण्याची ऑफर दिली आणि त्यांना मोफत जमीनही देऊ केली. शंकररावांनी केंद्र सरकारशी संपर्क साधला, परंतु 1975 पर्यंत सुझुकीनेही भारतात जाण्याचा विचार केला आणि त्यांचे प्रस्ताव नाकारले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT