महाराष्ट्र बातम्या

Video : ''ही वाघनखं शिवाजी महाराजांच्या वापरातील नाहीत'', इंद्रजित सावंत नेमकं काय म्हणाले?

संतोष कानडे

मुंबईः नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला इंग्लंडमधून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं येत आहेत. पंरतु या वाघनखांच्या ऐतिहासिक सत्यतेबाबत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आक्षेप घेतलाय.

इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्यूझियममधून महाराष्ट्रात आणली जात असलेली वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील आहेत, असं शासन म्हणत आहे. परंतु ते खरं नसल्याचं इंद्रजित सावंत म्हणाले.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे येत्या १६ नोव्हेंबर रोजी इग्लंडवरुन छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात घेऊन येणार आहेत. केवळ तीन वर्षे ही वाघनखं महाराष्ट्रात असतील. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी वाघनखं इंग्लंडला माघारी पाठवण्यात येतील.

इंग्लंडवरुन येत असलेल्या वाघनखांबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जावू लागले आहेत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले की, ही वाघनखं अफझल खानाच्या वधावेळी वापरलेली नाहीत. कारण अफझल खान वधाच्या वेळेला जी वाघनखं वापरली त्याविषयीची स्पष्टता आहे. १९१९ पर्यंत ही वाघनखं सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होती. त्याच्या नोंदीदेखील आहेत.

व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमधून तीन वर्षांसाठी राज्य शासन जी वाघनखं आणत आहे ती शिवछत्रपतींनी अफझल खान वधाच्या वेळी वापरलेलं नाहीत. कारण १९१९ पर्यंत इथं वाघनखं असतील आणि त्याची छायाचित्र, नोंदी असतील तर त्याच्याही अगोदरच म्यूझियमध्ये गेलेली वाघनखं ती असू शकत नाही.

सावंत पुढे म्हणाले, ज्या ग्रँड डफने म्युझियमध्ये वाघनखं दिली ती वाघनखं सातारकर छत्रपतींच्या गादीवर इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजांना बसवलं होतं. त्यांनी त्यांना दिलेली आहेत.

''मुळात राज्य शासन जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, ती त्यांची असल्याचं सांगत आहे. याबद्दल आम्ही यापूर्वीच संशोधन करुन लिहिलेलं आहे. जर खरंच ती महाराजांच्या वापरातील होती तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत, विनाकारण शिवप्रेंमींची दिशाभूल करु नये'' असं आवाहन इंद्रजित सावंत यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT