indurikar maharaj esakal
महाराष्ट्र बातम्या

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार? 'त्या' वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी

रोहित कणसे

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतता. मात्र अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात PCPNDT कलमांतर्गत दाखल गुन्ह्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे, ज्याकेडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रकरण का आहे?

२०२० साली इंदुरीकर महाराजांनी अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. २०२० साली दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्तता देखील करण्यात आली.

मात्र या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला. पुढे तोच आदेश सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे.

मागील महिन्यात समन्स बजावून देखील इंदुरीकर महाराज सुनावणीला गैरहजर राहिले. दरम्यान आजच्या सुनावणीला ते कोर्टात हजर राहणार का, ते पहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी अर्धा तास उशिराची मुभा; सरकारचा निर्णय, कारण काय?

अन् अर्जुनचा साक्षीला चेकमेट! कोर्टात दाखवला 'तो' पुरावा'; सगळेच शॉक, 'ठरलं तर मग'चा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Eknath Shinde : राजकीय समीकरणे बदलणार? येवला तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व वाढतेय

Government Scheme: मुलांच्या पालनपोषणासाठी मिळणार ४००० रुपये, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू, अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT