Shivsena Case 
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Case : सत्तासंघर्षावर निकाल देण्यापूर्वी CJI चंद्रचूड म्हणाले, "उद्याची सकाळ..."

Sandip Kapde

Shivsena Case : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या मोठा निर्णय देणार आहे. शिवसेना पक्षातील मतभेदानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील वादाशी संबंधित खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उद्या निकाल येणार आहे. हा निकाल फक्त शिवसेनेसाठी महत्वाचा नाही तर या निकालाच्या भविष्यातील राजकारणावर देखील प्रभाव पडणार आहे.

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी समलैंगिक विवाह प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, ते उद्या दोन प्रकरणांमध्ये निकाल देणार आहेत. उध्दव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरण तसेच दुसरे प्रकरण दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील वादाशी संबंधित आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे वादाच्या निकालावर सर्वांते लक्ष लागले आहे.

CJI चंद्रचूड म्हणाले, "उद्या आम्ही घटनापीठाशी संबंधित दोन निकाल देणार आहोत." यावेळी चंद्रचूड यांनी ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांना सांगितले की, "समलैंगिक विवाह प्रकरणातील युक्तिवाद उद्या दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरू होऊ शकतो, कारण सकाळची प्रचंड गर्दी असेल."

सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाची यादी

"उद्याची सकाळ कामांनी भरलेली आहे. घटनापीठांचे दोन महत्वाचे निकाल द्यायचे आहेत" अशी टिप्पणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान केली.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा हे पाच सदस्यांची घटनापीठ उद्या निर्णय देणार आहे. या खंडपीठातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एमआर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत.

सत्तासंघर्षावरील निकाल एकमताने येण्याची शक्यता आहे. हा निकाल फक्त सरन्यायाधीश वाचून दाखवणार आहेत. त्यामुळे दोन वेगळ्या निकालांची किंवा घटनापीठात मतभेदांची शक्यता कमी आहे.

निकालाची वेळ-

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सकाळी १०:३० वाजल्यापासून स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निकालपत्राचे वाचन करणार आहेत. या कामकाजचे थेट प्रसारण देखील होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT