Pankaja Munde and Anil Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : पंकजा मुंडेंवर त्यांच्या पक्षाकडून खूप अन्याय; अनिल देशमुख यांची टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यावरून राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपवर टीका केली आहे.

पंकजा मुंडे यांच्यावर त्यांचा पक्ष खूप अन्याय करत आहे. ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात ताकद देण्याचे काम केले, पक्ष वाढविला त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळे भारतीय जनता पार्टी पक्ष महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वाढला. पण दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्यावर पक्षात ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय होत आहे, त्याबद्दल त्यांनी विचार करून योग्य भूमिका घ्यायला पाहिजे असे मतही अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

याआधी बच्चू कडू यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यात यात्रा काढली आणि त्यानंतर त्यांच्या कारखान्यावर कारवाई सुरू झाली. म्हणजेच त्या महाराष्ट्रात फिरल्या त्यामुळं कारवाई सुरू झाली असेल, असा दावा बच्चू कडू यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT