Vanita Borade
Vanita Borade esakal
महाराष्ट्र

नारी शक्ती पुरस्कार! 51 हजार साप पकडणाऱ्या महाराष्ट्रीय महिलेचा सन्मान

सकाळ डिजिटल टीम

बुलढाणा शहरातील मेहकर येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय वनिता बोराडे यांना अनेकजण 'सर्पमित्र' म्हणतात.

सापाला पाहताच अनेकांना भीती वाटते आणि विषारी साप असतील तर माणूस पाहताच क्षणी बेशुद्ध होऊन जातो. पण बुलढाण्यातील एक महिला अशा सापांना सहज पकडते. तिने आतापर्यंत ५१ हजार साप पकडून जंगलात सोडले आहेत, हा विक्रमच आहे. विशेष म्हणजे तिने या सापांचे दात कधीच तोडले नाहीत. देशातील पहिली महिला सर्पमित्र जी वयाच्या १२ व्या वर्षापासून साप पकडतेय.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी (International Womens Day) राष्ट्रपती रामनाथ कोविंद 2020 आणि 2021 या वर्षासाठीच्या प्रतिष्ठेच्या नारी शक्ती पुरस्कारांनी 29 व्यक्तींना सन्मानित करणार आहेत. ८ मार्च रोजी राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम होणार आहे. वर्ष 2020 साठी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील वनिता बोराडे (Vanita Borade) यांनाही देशातील पहिल्या महिला सर्पमित्र (Sarpmitra) म्हणून सन्मानित करण्यात आलंय.

बुलढाणा शहरातील मेहकर येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय वनिता बोराडे यांना अनेकजण 'सर्पमित्र' म्हणतात. सापांच्या प्रजाती वाचवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्या काम करताहेत. वनिता या महाराष्ट्रातील पहिल्या महिला सर्पमित्र आहेत. परिसरातील रहिवासी भागात विशेषतः पावसाळ्यात लोक बाहेर पडणाऱ्या सापांना पकडण्यासाठी वनिता यांना फोन करतात. आतापर्यंत त्यांनी मानवी वस्तीतून मोठमोठे साप तसेच विषारी सापांच्या अनेक प्रजाती पकडून त्यांना जंगलात सोडून दिले आहे, जेथे ते नैसर्गिक वातावरणात राहू शकतील.

त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वनिता म्हणतात की, जर कुणाला वसाहतींच्या आसपास साप दिसला तर त्यांना मारू नका. त्याऐवजी मला फोन करून सांगा.

- साप हा या वातावरणाचा आणि बायो सर्कलचा खूप महत्त्वाचा भाग आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे या वर्तुळाला त्रास होऊ शकतो.

- वनिताने 'जगा आणि जगू द्या'च्या धर्तीवर काम करताना अनेक सापांना नवसंजीवनी दिली आहे.

- या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कुटुंबही या कामात देतं साथ

वनिता या लहानपणी आई-वडिलांसोबत शेतात काम करायच्या. येथे त्यांनी आदिवासी मुलांशी मैत्री केली. मग जंगलात त्यांच्याबरोबर राहून त्यांनी मासे, खेकडे, विंचू, साप आणि गोह यांनाही पकडलं. या कामात त्यांचे पती डी. भास्कर व मुलेही पूर्ण सहकार्य करतात.

शैक्षणिक अभ्यासक्रमात केला समावेश

सापांना पकडून त्यांना वाचवण्यासाठी वनिताने आपले आयुष्य समर्पित केले आहे. शाळा-कॉलेजमधील सापांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी ते कार्यशाळाही घेतात. ग्रामीण भागात त्यांना साप वाली बाई म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुले आणि मोठे साप पकडण्याचे काम शिकतात. डीएडच्या सेकंड इयर कोर्समध्ये वनिताचे काम आणि आयुष्यबद्दल सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT