crime

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Investment fraud case exposes : आरोपीच्या पत्नीने गुजरातमधील वलसाड पोलिस ठाण्यात पतीच्या अपहरणाची तक्रार दिल्याची माहितीही समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

money fraud case : दरमहा तब्बल १० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ५२ नागरिकांकडून १ कोटी ५९ लाख ५० हजार रुपये उखळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुजरातमधील वलसाड येथील राजूभाई दयाभाई देसाई (वय ६०) याच्याविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देसाई हा २०२४ मध्ये वरोऱ्यात आला होता. त्याने 'एन.आर. एंटरप्राइजेस' नावाची कंपनी असल्याचे सांगत गुंतवणूकदारांना आकर्षित केले. १९ ऑगस्ट २०२४ पासून अनेकांनी टप्प्याटप्प्याने त्याच्याकडे पैसे गुंतवण्यास सुरवात केली. सुरुवातीचे सुमारे अकरा महिने व्याजाची रक्कम वेळेवर मिळत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी पैसे गुंतविले.

मात्र, जुलै २०२५ नंतर मात्र व्याज देणे अचानक बंद झाले. गुंतवणूकदारांनी जेव्हा वारंवार संपर्क साधला तेव्हा देसाईने बँक खात्यात तांत्रिक अडचण असून दोन-तीन महिन्यांत सर्व रक्कम मिळेल, अशी उत्तरे देण्यास सुरवात केली. प्रत्यक्षात मात्र कोणतीही रक्कम गुंतवणूकदारांना परत मिळाली नाही.

फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर काही गुंतवणूकदार थेट गुजरातमधील वलसाड येथे पोहोचले. देसाईला घेऊन वरोरा येथे परतले. वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात सर्व गुंतवणूकदार जमले असताना देसाईने काहींना धनादेश दिले. मात्र ते वटले नाहीत. त्यानंतर त्याने स्टॅम्प पेपरवर ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम परत करण्याचे किंवा  स्वतःची जमीन विकून पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले.

ठरलेल्या मुदतीतही रक्कम न मिळाल्याने अखेर १४ फेब्रुवारीला शरद वाल्मीक मांदाळे यांनी ५२ गुंतवणूकदारांच्या वतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, गुंतवणूकदारांनी देसाईला वरोऱ्यात आणले. तेव्हाच त्याच्या पत्नीने गुजरातमधील वलसाड पोलिस ठाण्यात पतीच्या अपहरणाची तक्रार दिल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे... हिटमॅनच्या मराठी नाटकाच्या कलाकारांशी गप्पा

Wardha Crime News : १३ वर्षांनंतर न्याय! अल्पवयीन मुलगी पळवणाऱ्यास अखेर पुण्यातून अटक

Pune Property Tax : मिळकतकर वाढीवर उद्या फैसला

Akola Crime : सहा वर्षीय नराधमाकडून चिमुकलीवर अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update : मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशास २८ पर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT