sanjay raut sakal
महाराष्ट्र बातम्या

राऊत म्हणजे गवळी गँगचा शूटर, फोन टॅप करताना रश्मी शुक्लांची गेम?

ओमकार वाबळे

फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांचा यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला होता. या प्रकरणात सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादाय़क माहिती समोर आली आहे. तत्कालीन राज्य गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन कॉल्स टॅप केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात मविआ सरकारच्या नेत्यांकडून पुरावे देखील सादर करण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. (Rashmi Shukla Phone Tapping Probe)

मात्र, रश्मी शुक्लांना फोन टॅप होत असल्याची माहिती होती, असा वकिलांनी आरोप केला आहे. शुक्ला यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात संजय राऊत यांचा क्रमांक गवळी गँगमधील संतोष रहाटेच्या नावाने टॅप होत असल्याची माहिती आहे. शुक्ला यांना काही अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. मात्र त्यांनी जाणूनबूजून दुर्लक्ष कर त्यांना खडसावलं, असं आरोपपत्रात लिहिण्यात आलं आहे.

मविआ सरकारच्या सत्ता स्थापनेच्या काळात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा समोर आले होते. या प्रकरणी 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संजय राऊत याच्यासोबत नेमकं काय झालं होतं याबद्दल माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला. एकनाथ खडसेंचा जबाब नोदवल्यानंतर त्यातून बरीच नवीन माहिती मिळाली होती, तशीच वेगळी माहिती गोळा करण्याचा मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. यापूर्वी एकनाथ खडसे यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना हा फोन टॅपिंगचा प्रकार झाला. दरम्यान अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम १६५ आणि टेलिग्राफ कायद्याच्या कलम २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT