Vishwas-Nangre-Patil 
महाराष्ट्र बातम्या

Video : विश्वास नांगरे-पाटील यांचा 'बाला डान्स' पाहिला का?

सकाळ डिजिटल टीम

राज्यातीलच नव्हे, तर देशातील प्रसिद्ध आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

एका कार्यक्रमात नांगरे पाटील यांनी 'हाऊसफुल्ल-4' या चित्रपटातील 'बाला' या गाण्यावर ठेका धरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. 

हाऊसफुल्ल-4 च्या प्रमोशनवेळी अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना 'बाला' डान्सचे चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे टिक-टॉक आणि इतर सोशल साईटवर या गाण्याने धूम उठवली होती. अनेक समारंभाच्या ठिकाणी तसेच लग्नसराईच्या ठिकाणी हे गाणे आवर्जून वाजवले जात आहे. 

या गाण्याची भूरळ आयपीएस अधिकारी असलेल्या नांगरे पाटलांनी पडली. आणि या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. माणूस कोणत्याही पदी असला तरी मित्रांसोबत मिसळून जातो, असेच नांगरे-पाटील यांच्या या डान्समुळे सिद्ध होत आहे. 

कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी अशी नांगरे पाटील यांची ओळख आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांचे ते आयडॉलही आहेत. त्यांच्या प्रभावी भाषणांप्रमाणे त्यांचा हा डान्सही अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

सध्या त्यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. या अगोदर नांगरे-पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित आर्याने १७ मुलांना जमवलं कसं? गोळी झाडली की नाही? एन्काउंटरबाबत मोठे अपडेट समोर

Belagav Black Day : काळा दिनानिमित्त बेळगावात आज निषेध फेरी; कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदीच्या नोटिसा

Latest Marathi News Live Update : मराठी भाषकांवर अन्याय, बेळगाव सीमाभागात आज काळा दिन पाळला जाणार

MNS and MVA Morcha in Mumbai : निवडणूक आयोगाविरोधात आज 'मनसे'सह ‘मविआ’चा मुंबईत निघणार ‘सत्याचा मोर्चा’

‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; सोलापूर जिल्ह्यात ७,२६,९१८ वाहनांना जुनीच नंबरप्लेट

SCROLL FOR NEXT