Prakash Ambedkar Ajit Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'बाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, आम्ही एकत्र लढलो तर..

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी युती केल्यामुळं आगामी निवडणुकीतही याचा परिणाम दिसणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Politics : वंचित बहुजन (Vanchit Bahujan Aghadi) आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती झाली आहे, त्यामुळं आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल पहायला मिळणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) युती केल्यामुळं आगामी निवडणुकीतही याचा परिणाम दिसणार आहे, त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत समावेश होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आता प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या युतीबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय. प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेबत आघाडी केली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) टिकावी आणि त्यात बेरीज होण्याकरता जे असतील त्यांनी यावं. यासाठी अनेकांनी प्रयत्न करावे, असं आवाहन अजितदादांनी केलंय.

अजित पवार म्हणाले, 'वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं आम्ही एकत्र लढलो तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल. महाविकास आघाडीत 'वंचित' यावी ही माझी वैयत्तिक इच्छा आहे. मात्र, वरिष्ठ आणि पक्ष काय तो निर्णय घेईल.'

महाविकास आघाडीत एकत्रित बोलत असताना कुणाचा अपमान होणार नाही याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी, असंही ते म्हणाले. 'वंचित'ला मविआमध्ये घेण्याबद्दल अजित पवारांनी पहिल्यांदाच सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील एका वृत्तपत्रच्या मुलाखतीत अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'बाबत हे वक्तव्य केलंय. त्यामुळं याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

Man in burqa mumbai local Video : मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बुरखा घालून घुसला पुरूष अन् मग...

Solapur News : लग्नास नकारानंतर तरुणाने संपविले जीवन; मुलीला समोर बसून विचारण्याची केली होती विनवणी

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध संकटमोचक ठरलेल्या कर्णधार सू्र्यकुमारचा मोठा विक्रम; विराट कोहली, बाबर आझमला टाकलं मागे

SCROLL FOR NEXT