आयटी पार्क sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात आयटी पार्क होणारच! दरवर्षी येथे तयार होतात ६८०० इंजिनिअर, विमानसेवा सुरू, रेल्वे, महामार्गांची कनेक्टिव्हीटी, उजनी धरणात मुबलक पाणी, सुपर टॅक्स माफ, हायस्पिड इंटरनेटही

सोलापूर जिल्ह्यातील १५ अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी ६९०० अभियंते शिक्षण पूर्ण करतात. त्यांपैकी ७० ते ८० टक्के अभियंत्यांना नोकरीसाठी स्थलांतर करावे लागते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याचा शब्द दिल्यावर प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू झाला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १५ अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी सहा हजार ९०० अभियंते शिक्षण पूर्ण करतात. त्यांपैकी ७० ते ८० टक्के अभियंत्यांना नोकरीसाठी स्थलांतर करावे लागते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याचा शब्द दिल्यावर प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू झाला आहे. आयटी पार्क झाल्यानंतर सोलापुरातील अभियंत्यांचे स्थलांतर थांबेल, असा विश्वास सर्वांना आहे.

सोलापुरातून गोव्याला विमानसेवा सुरू झाली असून मुंबई आणि पुणे विमानसेवेसाठीही प्रयत्न सुरू आहे. सरकारकडून बोरामणी विमानतळाच्या विकासाचाही प्रयत्न आहे. रेल्वे, महामार्गावरील वाहतूक आता सुलभ झाली आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात आयटी पार्कसाठी लागणाऱ्या सर्व बाबी देखील उपलब्ध आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोलापुरात आयटी पार्क उभारावे, अशी मागणी करून त्यासाठी पाठपुरावा देखील केला होता. त्याला आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांचाही पाठिंबा होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्ही जागा द्या, मी आयटी पार्क आणतो’ असा शब्द दिला होता. त्यानुसार आता जागेचा शोध सुरू आहे. पण, आयटी पार्कसाठी जागा चिंचोली एमआयटी परिसरात किंवा शहर ज्या भागात वाढत आहे तिकडे असावी, अशी अपेक्षा अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांची आहे.

तरुण अभियंत्यांचे थांबेल स्थलांतर

सोलापूर जिल्ह्यातील १५ अभियांत्रिकी महाविद्यालयातून दरवर्षी संगणकशास्त्र व आयटीतून दीड ते दोन हजार अभियंते बाहेर पडतात. आयटी पार्क झाल्यास त्यांना सोलापुरातच अपेक्षित नोकरी मिळेल. सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासन आयटी पार्कसाठी सकारात्मक असून आयटी पार्क सुरू झाल्यास सोलापुरातील तरुणांचे विशेषत: अभियंत्यांचे स्थलांतर थांबेल.

- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव

आयटी पार्कसाठी जमेच्या बाजू

  • सोलापुरातून गोवा विमानसेवा सुरू, लवकरच मुंबई, पुणे विमानसेवा सुरू होईल

  • सोलापुरातून हैदराबाद, मुंबई, पुण्याला जायला दररोज वंदे भारतासह ७० हून अधिक रेल्वे गाड्या

  • उजनी धरणामुळे पाण्याची मुबलक सोय, सोलापुरात आहेत पंचतारांकित हॉटेलसह मोठमोठे हॉटेल

  • हायस्पीड इंटरनेट कनेक्शनचीही सोय; आयटी पार्कची जागा शहर जिकडे वाढत आहेत त्या भागात असावी

अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थिती

  • एकूण महाविद्यालये

  • १५

  • दरवर्षी तयार होणारे अभियंते

  • ६,९००

  • संगणकशास्त्र, आयटीचे अभियंते

  • १,८००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT