G kishan Reddy sakal media
महाराष्ट्र बातम्या

"जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांजवळील जैन किर्तिस्तंभ हटवण्यात येणार नाही"

केंद्रीय संस्कृती मंत्र्यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांजवळील (Ellora caves) जैन किर्तिस्तंभ (Jain Kirti Stambh,) हटवण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी (G kishan Reddy) यांनी जैन समाजाच्या राष्ट्रीय संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या लेण्यांजवळील कीर्तीस्तंभ हटवण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागातर्फे घेतला होता. त्यामुळे देशभरातील जैन समाजामध्ये अस्वस्थता पसरली होती.

यासंबंधी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जी. किशन रेड्डी यांची हैदराबाद येथे भेट घेतली. यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असे रेड्डी यांनी यावेळी सांगितले. जैन समाजाचे राष्ट्रनिर्माण कार्यातील योगदान, भगवान महावीर यांचा विश्व शांतीचा संदेश देशातील सर्वांसाठीच सन्माननीय आहेत, त्यामुळे समाजाच्या भावना जपल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

jain kirti stambh

गांधी यांनी कीर्तीस्तंभाची उभारणी व त्याच्या देखभाली संबंधातील माहिती देऊन याविषयीच्या समाजाच्या भावना व्यक्त केल्या. याचबरोबर जैन समाजाच्या देशभरातील विविध ठिकाणी असलेल्या प्राचीन तीर्थक्षेत्र संबंधी पुरातत्त्व विभागाकडून येत असलेल्या अडचणी, अनेक प्राचीन मंदिरांचा प्रलंबित असलेला जीर्णोद्धार, विविध ठिकाणी उत्खननात आढळणार्‍या जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा व मंदिरांचे अवशेष याचे हस्तांतरण यासंबंधी येणाऱ्या अडचणी, या बाबींवर त्यांनी संस्कृती मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.

सम्मेद शिखरजी, गिरणार, शत्रुंजय आदी तीर्थांचे पावित्र्य जपण्यासंबंधी पुरातत्त्व विभाग, संस्कृती खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळासमवेत लौकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासनही रेड्डी यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी, महासंघाच्या आंध्र प्रदेश विभागाचे अध्यक्ष मुकेश चौहान, तेलंगणा विभागाचे अध्यक्ष विमल नहार, दिगंबर समाजाचे पदाधिकारी अशोक पहाडे, मिथुन पोरवाल आदी मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भारताचा भव्य-दिव्य इतिहास रुपेरी पडद्यावर ! संजय लीला भन्साळी आणि केतन मेहतांच्या जय सोमनाथ सिनेमाचं पोस्टर रिलीज

SCROLL FOR NEXT