milind deora Sakal
महाराष्ट्र बातम्या

''पंतप्रधानांनीच निश्चित केली होती मिलिंद देवरांच्या राजकीय भविष्याची टायमिंग'', काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले...

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यासंदर्भात एक विशिष्ट टिपण्णी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मिलिंद देवरांच्या पक्ष सोडण्याची तारीख निश्चित केली होती, असं ते म्हणालेत.

संतोष कानडे

मुंबईः काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. देवरा यांनी रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला . सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

मिलिंद देवरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणत खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यासंदर्भात एक विशिष्ट टिपण्णी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मिलिंद देवरांच्या पक्ष सोडण्याची तारीख निश्चित केली होती, असं ते म्हणालेत.

जयराम रमेश यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, ''मुरली देवरा हे नेहमी काँग्रेस पक्षासोबत ताकदीने उभे राहिले.'' पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, वास्तविक त्यांचं सगळं नाटक सुरु होतं, त्यांची पक्ष सोडण्याचं निश्चित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांच्या पक्ष सोडण्याची वेळ ठरवण्यात आलेली होती.

जयराम रमेश पुढे म्हणाले, मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केलं. त्यांचे सगळ्या पक्षांतील नेत्यांसोब मैत्रीचे संबंध होते. परंतु ते एक कडवट काँग्रेसी नेते होते. जे कायम सुख-दुःखात पक्षासोबत उभे राहिले.

असं म्हणत त्यांनी मिलिंद देवरा यांना टोला लगावला. देवरा हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात आहे. काही वेळापूर्वी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत.

मिलिंद देवरा कोण आहेत?

मिलिंद देवरा हे महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. मुरली देवरा केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. मुंबई दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने नेहमीच विजय मिळवला. त्यामुळे देवरा कुटुंबाचा या लोकसभा मतदारसंघाशी अनेक वर्षांपासून संबंध आहे. इतकेच नाही तर उद्योगपती अंबानी त्यांचा प्रचार करायचे, अशी देवरा यांची ओळख आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत देखील रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी देवरा पाठिंबा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन राबवित जीवदान दिले

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT