Fadanvis on Pravin Chavan
Fadanvis on Pravin Chavan 
महाराष्ट्र

"स्टिंग ऑपरेशनचं 'जळगाव' कनेक्शन"; सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर करत महाविकास आघाडीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच यामध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांचाही हात असल्याचा खळबळजनक माहिती या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आली होती. पण हे स्टिंग ऑपरेशन बनावट असून यातील दृश्य आणि आवाज वेगळा असल्याचा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. तसेच या स्टिंग ऑपरेशनचं जळगाव कनेक्शन असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. (Jalgaon connection of sting operation Public Prosecutor Praveen Chavan allegation)

चव्हाण म्हणाले, "या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांनी ज्या केसचा आधार घेतला आहे, त्याची कागदपत्रे जर आपण पाहिली तर त्यामध्ये दिसून येतं की गिरीश महाजनांची त्या गुन्ह्यात काय भूमिका आहे. याचा तपास सुरु असून तपास अधिकाऱ्यांनी ही फाईल हायकोर्टात मांडली आहे"

या प्रकरणाचं जळगाव कनेक्शन

माझ्या कार्यालयात नेहमी येणारा आशील तेजस मोरे (Tajas More) यांना आपल्या घडाळ्यात छुपा कॅमेरा लावून हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. त्याचा जामीन अर्ज माझ्याकडे होता, त्याचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे, ते घड्याळ त्यानंच आणलेलं होतं. त्यानं मला एसी बसवून देतो असंही म्हटलं होतं. पण मी त्याला नकार दिला होता. त्यानंतर त्यानं स्मार्ट टीव्ही बसवतो असं सांगितलं पण त्यालाही मी नकार दिला. कारण मी आजतागायत कोणाकडूनही भेटवस्तू स्विकारलेली नाही. त्यानं मला विविध प्रकारे प्रलोभनं दिली. पण मी प्रत्येक वेळी त्याला नकार दिला. त्याचा आणि त्याच्या पत्नीचा मी यापूर्वी अटकपूर्व जामीन मिळवून दिला होता. त्याची फी देखील अजून बाकी आहे. तो माझा आशील होता, तो जळगावचा होता. त्यामुळं त्याला हाताशी धरुन विरोधकांनी हे संपूर्ण षडयंत्र रचलेलं आहे. चौकशीत हे पूर्णपणे उघड होणार आहे.

तेजस मोरेबरोबर चाचू कैद्याचाही समावेश

यामध्ये आणखी कोणकोणत्या व्यक्ती आहेत हे आज ना उद्या बाहेर येणार आहे. तेजस मोरेसोबत तुरुंगात असलेला चाचू नावाचा कैदी सकाळी इथं आला होता जो सीसीटीव्हीमध्ये दिसून येतो. हा चाचू नावाचा व्यक्ती सध्या नांदेडमध्ये पळून गेला आहे. यामध्ये सर्व कायदेशीर बाजू तपासून मी गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील कारवाई करणार आहे, असंही चव्हाण यांनी सांगितलं आहे.

व्हिडिओ क्लीपमध्ये फेरफारचा केला दावा

आपण या क्लीपचं बारकाईनं अवलोकन केलं तर त्यात लक्षात येतं की, कुठल्याही प्रकारचं यामध्ये मॅचिंग दिसून येत नाही. दुसरं म्हणजे यामध्ये जी वक्तव्य आहेत त्यात फेरफार केलेला आहे. यामध्ये आक्षेपार्ह असं कुठलंही वक्तव्य दिसत नाही. यामध्ये त्यांनी फेरफाराचा केविलवाना प्रयत्न केल्याचं स्पष्टपणे दिसून येत. आजच्या जगात व्हिडिओ आणि आवाजामध्ये फेरफार करता येतो. त्यांनी जो दावा केला आहे की, ऑफिसमध्ये हा प्रकार झालेला आहे. एक तर त्यांनी विनापरवानगी त्यांनी ऑफिसमध्ये येऊन गुन्हा केला आहे. त्याचबरोबर त्यांनी व्हिडिओमध्ये कटछाट केली आहे म्हणजेच त्यातील काही भाग लपवलेला दिसून येतोय. यासंपूर्ण प्रकरणाची जेव्हा चौकशी होईल तेव्हा यातील सर्व सत्य बाहेर येईल, असा पुनरुच्चार सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT