Politics News 
महाराष्ट्र बातम्या

Politics News : शिवसेना-काँग्रेसने राष्ट्रवादीला धोका दिला! महाविकास आघाडीत बंडखोरी

सकाळ डिजिटल टीम

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बंडखोर संजय पवार हे विजयी झाले आहे.  संजय पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होती. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आमने-सामने होते. महाविकास आघाडीकडून रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे संजय पवार यांनी बंडखोरी केली.

संजय पवार यांना शिंदे गटाने पाठिंबा दिला होता. एका पक्षाचे दोन्ही उमेदवार समोरासमोर असल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये २१ पैकी ११ मत संजय पवार यांना मिळाली तर पराभूत झालेल्या रवींद्र पाटील यांना १० मत मिळाली. 

काँग्रसमध्ये फूट पडल्याने पराभव झाल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रवींद्र पाटील विजयी होतील म्हणून चर्चा होती. मात्र काही क्षणात राजकीय घडामोडी घडल्या आणि संजय पवार यांच्या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

एकनाथ खडसे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मत आहेत. राष्ट्रवादीचे जे १० मत आहेत. यामध्ये १ मत फुटलं, त्यानी गद्दारी केली. मी स्वत: पुढाकार घेऊन ही बँक ताब्यात आणली. या ठिकाणी शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी संजय पवार यांना समर्थन द्यावं. काँग्रेसने आणि शिवसेनेने संजय पवार यांना समर्थन दिलं. महाविकास आघाडीत अशाप्रकारे आम्हाला अपेक्षा नव्हती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभ नाहीतर 'या' व्यक्तीवर होतं जया बच्चन यांचं पहिलं प्रेम, म्हणालेल्या...'ते मला देवासारखे वाटतात'

Pune Dust Pollution: पुणे पिंपरीत डंपर मिक्सरचा ‘धूळकंठ’; अवजड वाहनांमुळे वायू, धूळ आणि ध्वनी प्रदूषण वाढले

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Snake in Grapes Farm : शेतकऱ्याच्या काळजाचा ठोकाच चुकला! द्राक्ष वेलीवर वेटोळे घालून बसलेल्या नागाला पाहून काळजाचं पाणी झालं; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ..

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

SCROLL FOR NEXT