Lonikar Tope Audio Clip esakal
महाराष्ट्र बातम्या

Lonikar Tope Audio Clip : शिव्यांची लाखोली अन् धमकी..! दोन माजी मंत्र्यांचं संभाषण व्हायरल

जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेते माजी मंत्री राजेश टोपे आणि दुसरे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

संतोष कानडे

मुंबईः जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेते माजी मंत्री राजेश टोपे आणि दुसरे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये लोणीकर हे टोपेंना शिव्या घालताना दिसून येत आहेत, शिवाय धमकीही देत आहेत. यानंतर लोणीकरांनी ती क्लिप बनावट असल्याचं म्हटलंय.

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील उपाध्यक्ष निवडीवरुन दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचं दिसून येतंय. महिन्याभरापूर्वीदेखील लोणीकरांच्या कार्यकर्त्यांनी टोपेंच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्यानंतर टोपेंच्या कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या घरावर दगडफेक केली होती.

त्यानंतर ही क्लिप व्हायरल झालीय. सदरील व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये, बँकेच्या उपाध्यक्ष पदासाठी लोणीकरांच्या मुलाची निवड करणं ठरलेलं असतानाही दुसऱ्याची निवड झाली, अशा आशयाचा संवाद आहे. त्याचा राग लोणीकरांनी काढल्याचं दिसून येतंय. 'सकाळ' या ऑडिओ क्लिपची पुष्टी करीत नाही.

कथित ऑडिओ क्लिपमधील संवाद

टोपे- अर्जूनराव साक्षीदार आहेत. अर्जूनराव बोलले, दानवेंना मीही बोललो.. काल तर टोकाचं बोलणं झालं. परंतु ते म्हणाले, भैय्यासाहेब यावेळेस आम्हाला पाहिजे.. काल फोनवर आज लग्नातही बोलले. मी म्हणोलो आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना... आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. ते म्हणाले, ते आले नाहीत.. चर्चेत नव्हते. यावेळेस तुम्ही सोडावं असं मी त्यांना बोललो...

लोणीकर- भैय्यासाहेब, राजकारण मोठं नसतं. त्या उपाध्यक्ष पदामध्ये काहीही नाहीये.. आम्हाला माहिती आहे. तुम्ही शब्द दिला अर्जुनरावांच्या बंगल्यावर चर्चा केली-

टोपे- शब्द पाळू ना पण पुढच्या याच्यात पाळू...

लोणीकर- अरे हा @@#%^& कडू तुझं टक्कल.. तु*&&^@# टोप्या.. कडू%@@# चोर कुत्रा..

यातील शिव्या आणि धमक्या इथे देता येत नाहीत. परंतु या क्लिपमुळे राजकीय स्तर किती खालावला आहे, हे दिसून येतेय. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे. यासंदर्भात राजेश टोपे यांची बाजू पुढे आलेली नाही.

बबनराव लोणीकरांनी प्रतिक्रिया देताना, अशी शिवीगाळ केली नसल्याचं म्हटलं. ही ऑडिओ क्लिप बनावट असून ती मी ऐकली नाही.. त्याबद्दल मला काहीही माहिती नाही; अशी बाजू त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Alert : पुण्यात 'कोल्ड्रिफ' कफ सिरपचे वितरण नाही; नागरिकांनी काळजी करू नये, एफडीए

Heart Attack Case Kolhapur : हर्ट अटॅकला वय राहिलं नाही, २४ वर्षीय सोहम मित्रांसोबत फिरायला गेला अन् घरी परतलाच नाही

माेठी बातमी! 'स्टार फार्मा वितरकाकडून डिलाईफ सिरपच्या २०० बॉटल जप्त'; औषध प्रशासनाची कारवाई, शासनाने काय आदेश दिले?

Buddhist Community : 'आता बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांनाही मिळणार अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र'; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे आदेशात?

Sanju Samson: संघासाठी ९व्या क्रमांकावरही फलंदाजी करेन, प्रसंगी...! संजू हसनू बोलला, पण त्याच्या व्यथा डोळ्यांतून जाणवल्या Video

SCROLL FOR NEXT