Jalna Maratha Andolan 
महाराष्ट्र बातम्या

Jalna Maratha Andolan: शरद पवार मराठा आंदोलकांना भेटणार; जालना, बीड जिल्ह्यात बंदची हाक

कार्तिक पुजारी

Jalna Maratha Andolan Reservation Protest

Mumbai News- जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले असून त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये आंदोलकांकडून बंदची हाक देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार जालना जिल्ह्यात जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत.

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचं उपोषण सुरु होतं. यावेळी कथितरीत्या पोलिसांवर गदडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले आहेत.

शरद पवार आज जालना जिल्ह्याला भेट देणार असून हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी आंदोलकांची ते विचारपुस करतील.

जालन्यातील घटनेचे पडसाद राज्यात दिसून येत आहेत. बीडमध्ये आंदोलकांकडून बंदचे आवाहन करण्यात आले आहे. जालना, बीड, संभाजीनगरमध्ये तणावाची स्थिती आहे. शुक्रवारी धुळे-सोलापूर महामार्गावर १४ गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. माहितीनुसार, आतापर्यंत ४५ पोलिस जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

जालन्यातील घटनेचा सर्व स्तरातील नेत्यांकडून निषेध व्यक्त होत आहे. उदयराजे भोसले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला अशी प्रतिक्रिया दिली.

जालन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. नंदूरबारमध्ये एका एसटी बसला जाळण्यात आल्याची घटना समोर आलीये. नंदुरबार आणि जालन्यामध्ये एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सोलापुरातही जाळपोळीची घटना घडली आहे. राज्यात मराठा आंदोलनाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT