Jamkhed Bazar Committee Chairman- Deputy Chairman will be elected on May 16 esakal
महाराष्ट्र बातम्या

Jamkhed: रोहित पवार-भाजपसाठी १६ तारीख महत्त्वाची; जामखेड बाजार समिती समसमान संचालकांमुळे चुरस

रुपेश नामदास

जामखेड बाजार समितीच्या सभापती- उपसभापतींची निवड १६ मे रोजी होणार आहे. जामखेड बाजार समितीचे सचिव व्ही. एम. सय्यद यांनी आज (शनिवारी) विशेष सभेची नोटीस काढली असून, बाजार समितीच्या १८ नूतन संचालकांना ती देण्यात येणार आहे. ही बैठक निवडणूक निर्णय अधिकारी आर. एफ. निकम यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. (Jamkhed Bazar Committee Chairman- Deputy Chairman will be elected on May 16)

दुपारी एक ते दीडच्या दरम्यान उमेदवारी अर्जवाटप व स्वीकृती, दुपारी दीड ते पावणेदोन दरम्यान अर्जांची छाननी, दुपारी २ वाजता उमेदवार यादी प्रसिद्धी, दुपारी दोन ते सव्वादोन माघार, दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी अंतिम यादी प्रसिद्ध करणे, आवश्यकता वाटल्यास दुपारी दोन पंचवीस ते तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविणे. मतमोजणी तीन ते सव्वातीनपर्यंत करणे व साडेतीन वाजता निकाल घोषित करणे, असा निवडणूक कार्यक्रम आहे.

निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजप, राष्ट्रवादी व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात गटाला समसमान प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. कोणाकडेही पूर्ण बहुमत नसल्याने सभापती आणि उपसभापती निवडीसाठी दोन्ही गटांतील संचालक ईश्वरचिठ्ठीवर आशा ठेवून आहेत. असे असले, तरी दोन्ही गटांनी आपापले संचालक अज्ञातस्थळी रवाना केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT