मुंबई: गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रात सक्रिय कोविड - 19 केसेसमध्ये 35 टक्क्यांनी घट झाली आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार, 9 जानेवारीपर्यंत राज्यात 52,960 सक्रिय केसेस नोंदवले गेले. ती 8 फेब्रुवारीपर्यंत घटून 34,720 वर आली आहे. राज्य अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घट लोकांमध्ये झालेल्या जनजागृती आणि राज्य सरकारने संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या कडक उपाययोजनेतून झाली आहे.
पुढील सहा महिने स्वत: चे संरक्षण महत्त्वाचे
दरम्यान, पुढील सहा महिन्यांपर्यंत मुंबईकरांनी स्वत: चे संरक्षण काटेकोरपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण मोहिम आणि रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे त्यात कोणतीही तडजोड होता कामा नये असे आवाहन तज्ज्ञ मंडळींनी केले आहे.
सक्रिय रूग्ण ही अशी एकूण रूग्णांची संख्या आहे जी सध्या रूग्णालय आणि कोविड-19 केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत किंवा घरी क्वारंटांईन आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सर्वांनी केलेल्या प्रयत्नांचा मुंबईतील केसेसवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. तरीही, कोणत्याही प्रकारची तडजोड उपाययोजनांच्या बाबतीत केली जाणार नाही. विषाणूचा प्रसार पूर्णपणे नियंत्रित होईपर्यंत नागरिकांना सर्व कोविड -19 चे प्रोटोकॉल पाळावे लागतील. दरम्यान, नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्ये नोंदवल्या जाणार्या केसेसच्या तुलनेत दररोजचे केसेसही कमी झाले आहेत. दरम्यान, 73 टक्के कोविड बेड्स रिक्त आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ही 94 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
शिवाय, आता लोक कोरोनाची लक्षणे ओळखून तात्काळ उपचारांसाठी धाव घेतात. त्यातून संसर्ग पसरु नये यासाठी मदत होते. शिवाय, रिकव्हरी लवकर व्हावी यासाठी मदत होते. आणि सक्रिय प्रकरणांचा गुणाकार रोखण्यास मदत होते. सर्व गोष्टींचा अभ्यास केला गेला तेव्हा ही संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे.
राज्य कोविड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, सक्रिय प्रकरणांची संख्या कमी होत आहे ही एक चांगली बाब आहे आणि राज्यातील संख्या कमी होईल अशी अपेक्षा आणखी काही काळाने करु शकतो. लस आली असली तरी नागरिकांनी पुढचे सहा महिने कोविड -19 च्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि लस घेण्यासाठी लोकांनी पुढे यावे.
----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
January month number of active corona virus cases in Maharashtra come down by 35 percent
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.