NCP Leader Jayant Patil File Photo
महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्र बंदला बदनाम करण्यासाठी गालबोट लावण्याचा प्रयत्न'

लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त करायचा सोडून भाजपा त्याचं समर्थन करत असेल तर अवघड आहे,

सकाळ डिजिटल टीम

लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त करायचा सोडून भाजपा त्याचं समर्थन करत असेल तर अवघड आहे,

महाविकास आघाडी सरकराच्या या महाराष्ट्र बंदला बदनाम करण्यासाठी काही पक्ष पुढं येत आहेत. या बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु माहिती घेतल्याशिवाय यावर बोलणे योग्य नाही. भारतीय जनता पक्षाचे आमदारांनी जी घोषणा केली याचा आम्ही विरोध करू. लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त करायचा सोडून भाजपा त्याच समर्थन करत असेल तर अवघड आहे, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. आज मुंबईत ते बोलत होते.

ते म्हणाले, लखीमपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण राज्यभर बंद पाळण्यात आला आहे. सर्व गरजेच्या वस्तू सोडून बंद करण्याचे घोषणा आवाहन आघाडी सरकरानं जनतेला केलं आहे. याला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु काहीजण याला गोलबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर आम्ही आज सांयकाळी बोलू.

पुढे ते म्हणाले, या घटने संबंधी भाजपच्या गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला दुसऱ्या दिवशी अटक झाली आहे. तो राजकर्त्याचा मुलगा असला तरी त्याला इतकी सवलत का? यामुळे भारतीय जनता पक्षाविरोधी आज देशभर संतापाची लाट निर्माण झालेली आहे. कारण लखीमपुर दुर्घटनेत शेतकऱ्यांचा चिरडून मारण्याचं काम करण्यात आल्याचा निषेध सर्वसामान्य माणसांनी केला आहे. भाजपाच्या गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे, पण भारतीय जनता पक्षाची नेहमीची पद्धत आहे, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT