Jayant Patil on Union Budget
Jayant Patil on Union Budget google
महाराष्ट्र

...तर मोदी सरकारचं कौतुक होईल, जयंत पाटलांचं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उद्या म्हणजेच १ फेब्रुवारील केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) जाहीर होणार आहे. त्यात सरकार कोणत्या क्षेत्रासाठी काय घोषणा करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यावरूनच जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Maharashtra Minister Jayant Patil) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली आहे. महाराष्ट्राला पाहिजे त्याप्रमाणात मदत मिळत नसल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्राला पूर्वी मनमोहनसिंग यांचे सरकार असताना ज्या पद्धतीनं मदत मिळायची तशी मोदी सरकारच्या काळात मिळत नाही. गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच कमतरता आहे. उद्याचा बजेट हा उत्तर प्रदेश आणि पंजाब या निवडणुका समोर ठेवून जाहीर केला जाईल. तसेच भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात गेले होते. त्यामुळे या बजेटमध्ये त्यांच्यासाठी काही तरतुदी करून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करेल, अशी टीका मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकावर केली.

...तर मोदी सरकारचं होऊ शकतं कौतुक -

केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यामध्ये राज्याचा केंद्रात मोठा हिस्सा असायला हवा. आता सध्या तसं काही दिसत नाही. पेट्रोल-डिझेलवर कर लावून देशाची अर्थव्यवस्था चालवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तोटा मध्यमवर्गीयांना होत आहे. इंधनावर कर कमी करणं, आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे इंधन उपलब्ध करून देणे या घोषणा जर बजेटमध्ये केल्या तर मोदी सरकारचं कौतुक होऊ शकतं, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसे यांची भूमिका केलेला चित्रपटाला विरोध असणे स्वाभाविक आहे. पण, त्याआधीच त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते राजकारणात नसताना त्यांनी ती भूमिका केली. पण, आता आत्मक्लेश करायचं ठरवलं, असं जयंत पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT