Devendra Fadanvis vs Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'बाळासाहेब ठाकरेंप्रमाणं फडणवीसांनी तेव्हा का जबाबदारी स्वीकारली नाही'

सकाळ डिजिटल टीम

'13 वर्षाच्या बालकाला घेऊन आडवाणी बाबरी मशीद पाडायला गेले का?'

सांगली : बाबरी मशीद (Babri Masjid) कारसेवकांनी पाडली, तेव्हा मी स्वतः त्यांच्या सोबत होतो, असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) जयंत पाटलांनी चांगलाच समाचार घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाबरीपतनावेळी त्याठिकाणी होते, असा दावा करीत असतील तर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे तेव्हा जबाबदारी का स्वीकारली नाही, असा सवाल जलसंपदामंत्री पाटील यांनी उपस्थित केलाय.

जयंत पाटील म्हणाले, बाबरी मशीद पडली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? त्यावेळी 13 वर्षाच्या बालकाला घेऊन आडवाणी बाबरी मशीद पाडायला गेले का? तसं असेल तर आडवाणींनी बालकाचे प्राण धोक्यात घातले म्हणून त्यांच्यावरही केस होईल. हे प्रकरण गंभीर आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय. फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, पण आजवर बाबरीपतनात ते सहभागी असल्याचं कधीच सांगितलं नाही. इतकी वर्षे त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून का लपविली, असा प्रश्न मला पडलाय. बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) लगेच बाबरीपतनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी फडणवीस यांनी जबाबदारी का स्वीकारली नाही? कारसेवकांबरोबर सहभागाचा तो किस्सा सविस्तर सांगण्याची विनंती मी फडणवीस यांना भेटीवेळी करेन. त्यांनी सर्व घटनाक्रम मला व्यवस्थित सांगावा, अशी इच्छा असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

धार्मिक राजकारणावर पाटील म्हणाले, 'मार्क्सनं म्हटल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. हीच गोळी सर्वसामान्य जनतेला देऊन त्यांना महागाईच्या प्रश्नापासून अलिप्त ठेवायचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी मोदी सरकार काही बुजगावण्यांना पुढं करीत आहे. सरकार चालविण्यामधील अपयश लपविण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सामान्य माणूस अशा गोष्टींना बळी पडणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते.' दरम्यान, मुंबईतील सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्रदिनी भाजपनं घेतलेल्या बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक तिथे नव्हते, असं वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीदेखील आज फडणवीसांवर उपरोधिक टीका केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: महावीर जयंतीला बँका सुरू राहणार की नाही? बँका सलग दोन दिवस बंद? RBI काय सांगते

"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण

Latest Marathi News Live Update : पुण्याला अवकाळीचा तडाखा, ३ तासात १४ ठिकाणी पडली झाडे

Mahur News : माहूर मध्ये ‘गैरहजर’ कर्मचाऱ्यांची ‘पंचायत’; गट विकास अधिकाऱ्यांकडून १३ कर्मचाऱ्यांना शो कॉज

Junnar Crop Damage: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा कहर; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT