Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : 'ती गुप्त बैठक नव्हतीच!'; अजित पवार-शरद पवारांच्या 'त्या' भेटीवर जयंत पाटलांचा खुलासा

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची काल (शनिवारी) पुण्यात उद्योजक अतुल चोरडियांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीत जयंत पाटील देखील सहभागी होते अशी माहिती देखील समोर आली होती. दरम्यान आज (१३ ऑगस्ट) रोजी जयंत पाटील यांनी या भेटीबद्दल माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांच्यानंतर आता त्यांच्या निकटवर्तीय व्यक्तीला ईडीची नोटीस आल्याने ही गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबद्दल खुद्द जयंत पाटील यांनीच खुलासा केला आहे.

ईडीची नोटीस आल्यानेच काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये गुप्त बैठक झाली असल्याच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं की त्या ईडीच्या नोटीसीचा आणि अजित पवार हे शरद पवारांना भेटण्याचा काही संबंध नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. ईडीकडून एका कंपनीच्या बाबतीत साक्ष म्हणून त्यांना (जयंत पाटील यांचे बंधू) बोलवण्यात आल्याचे देखील जयंत पाटील म्हणाले.

भेटीबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "कोण- कोणाला भेटलं यावर कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम असण्याची गरज नाही, लोक-लोकांना भेटत असतात. त्यामुळे याबद्दल विशेष सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. ती गुप्त बैठक नव्हतीच. कोण्यातरी ओळखीच्या व्यक्तीच्या घरी जर लोकं...मी पवार साहेबांसोबत गेलो होतो,पण मी निघून आलो. त्यामुळे काय चर्चा झाली मला माहिती नाही."

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ईडीचा काही विषय नाही. निकटवर्तीयांना म्हणजे माझ्या बंधूना ईडीची नोटीस आली आहे. एका कंपनीसंदर्भात त्याना माहिती विचारण्यात आली आणि ते चार दिवसांपूर्वीच जाऊन आले. त्याचा आणि बैठकीचा काही संबंध नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

लवकरच मंत्रिमंडळात जयंत पाटील दिसणार अशा चर्चा सुरू आहेत, याबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, अशा चर्चा नेहमीच सुरू असतात. कोणताही आमदार कधीही मंत्री होऊ शकतो, अशा आशयाने अशा बातम्या येत असतात, त्याकडे फार लक्ष देऊ नका असं उत्तर जयंत पाटलांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT