Jayant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: 'जयंत पाटील भाजपच्या वाटेवर; पवारांनी राजीनामा दिला तेव्हा फक्त रडायचं नाटक...'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा शिवसेनेचे नेत्याने केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा जयंत पाटील केवळ नाटक करत होते असंही शिरसाट यांनी म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

'राष्ट्रवादीला आमचा पुळका का आलेला आहे हेच कळायला मला मार्ग नाही. जे जयंत पाटील आज स्वत:चं भाजपच्या वाटेवर आहेत ते म्हणतात पक्षाची स्थापना गद्दारीतून झाली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत केलेली गद्दारी त्याच्यातून निर्माण झालेले हे सर्व आता आम्हाला गद्दारीची भाषा शिकवणार हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे. आम्ही त्यांची चिंता करत नाही असंही संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

तर 'जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हणत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा, जयंत पाटील केवळ नाटक करत होते असंही त्यांनी म्हंटलं आहे. शरद पवार यांनी राजीनामा देणार असं जाहीर करताच जयंत पाटील प्रचंड भाऊक झाले होते.(Latest Marathi News)

त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, 'जयंत पाटील इतके का रडत होते, तुम्हाला माहीत आहे का? कारण त्यांना माहीत आहे, उद्या काय घडणार आहे ते शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला तर मी काय करू? मी तर मेलोच, म्हणून ते ओक्साबोक्शी रडत होते बाकी काही नाही, ते राजीनामा दिल्यामुळे रडत नव्हते. त्यांचं रडणं वेगळं होतं. हे असे बोलणारे पटकन उड्या मारतात, म्हणून थोडे दिवस तुम्ही वाट पहा, तुम्हाला जयंत पाटील यांचं मार्गक्रमण कुठे तरी झालेलं दिसेल असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

तर काही दिवसांपूर्वी जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर संजय शिरसाट यांच्या या दाव्यावर जयंत पाटील काय उत्तर देणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT