political esakal
महाराष्ट्र बातम्या

'उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं चुकीचं'

उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांना मत अधिक पडली आहेत हे भाजपाने विसरुन जाऊ नये - जयंत पाटील

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांना मत अधिक पडली आहेत हे भाजपाने विसरुन जाऊ नये - जयंत पाटील

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं विजयाचा झेंडा रोवला आहे. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाजपाकडून निवडणुक विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तांतर अटळ असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. आता त्यांच्या या दाव्यावर राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचं असा पलटवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला उत्तर देताना ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये (UP) मायावती यांना मत अधिक पडली आहेत हे भाजपाने विसरुन जाऊ नये. सर्वपक्ष यूपीमध्ये एकवटले असते तर विजय झाला असता. भाजपच्या (BJP) हातातून ही अनेक राज्य गेली होती. महाराष्ट्राच्या जनतेची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला हरकत नाही, पण भाजपातील लोकांवरही कारवाई व्हावी, आम्हीही भाजपची यादी दिली आहे त्याप्रमाण कारवाई व्हावी, असेही ते म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, जंगजंग पछाडूनही महाविकास आघाडी (Mahavika Aghadi) पडत नाही हे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळं भाजपाने हे प्रयत्न चालवले आहेत. यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे, देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे त्याचा विरोध करायला हवा. गोव्यात आमचे फारसे नेतृत्व नव्हते. आम्ही काँग्रेससोबत (Congress) येईल याची वाट पाहत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात तुंबळ हाणामारी

Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत

Pimpri Chinchwad: बीआरटी स्थानके अंधारात; मद्यपींचा वावर, दिवे बंद असल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

Sangli Crime:' िसमकार्ड हॅक करून पोलिसदादांनाही हॅकर्सकडून गंडा'; धक्कादायक प्रकार उघडकीस

Sangli News: ‘आधी मोबदला द्या; मगच वावरात पाय ठेवा’; विटा-बस्तवडे मार्गावर शेकापतर्फे मोर्चा

SCROLL FOR NEXT