jayant patil on shivsena role  esakal
महाराष्ट्र बातम्या

'शिवसेनेनं भूमिका मांडलीये, आता कोणता निर्णय घेणार पाहू'

शिवसेनेनं मित्र पक्षांशी यासंबंधित कोणतीही चर्चा केलेली नाही, जयंत पाटलांच स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेनं मित्र पक्षांशी यासंबंधित कोणतीही चर्चा केलेली नाही, जयंत पाटलांच स्पष्टीकरण

शिवसेनेनं मित्र पक्षांशी यासंबंधित कोणतीही चर्चा केलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. (maharashtra politics) शिवसेनेनं त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळं शिवसेना आता काय निर्णय घेणार पाहु, असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. मात्र चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. (jayant patil on shivsena role)

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे, त्यांनी अंतर्गत चर्चा आणि विचार करुन केलं असेल, त्यामुळे सध्या वेट आणि वॉच या भूमिकेत असल्याचं पाटीला यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचा इतिहास असा आहे की, अनेकांनी हा पक्ष सोडला आणि सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळं पक्षांचे कार्यकर्ते हे आमदारांबरोबर नाही तर शिवसेनेसोबत असतात, हे अनेकवेळा सिद्ध झालं आहे, त्यामुळं जे काही होईल ते पाहु, असंही त्यांनी सांगितलं.

पुढे जयंत पाटील म्हणाले, वर्षा सोडून मातोश्रीवर जाणे हा मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. सध्याच्या परिस्थितीवरुन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यावर राष्ट्रवादीच्या नाराजीचा काही प्रश्न येत नाही. शिंदे गटातील आमदार हे सेनेचे आहेत. एकदम सत्ता गेली की, जनतेची काम थांबतात. दरम्यान, आजची बैठक ही राष्ट्रवादीच्या आमदारांना सद्यस्थिती सांगण्यासाठी असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक कामे झाली आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोबत आहोत. हे सरकार वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. महाविकास आघाडी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व आमदार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेने सोबत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Manoj Jarange: बीडमध्ये होणारा ओबीसी मेळावा राष्ट्रवादी पुरस्कृत; मनोज जरांगे यांची टीका, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

Pro Kabaddi 2025: पराभवाची व्याजासह परतफेड! यू मुंबाचा तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय

Panchang 17 October 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pune Weather Update: अति हलक्या पावसाची पुणे परिसरात शक्यता

SCROLL FOR NEXT