Jayant Patil warn bjp to be aware of devendra fadanvis sudhir mungantiwar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis : फडणवीसांना गोड बोलतात म्हणून हलक्यात घेऊ नका; जयंत पाटलांचा भाजपला सल्ला

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोड बोलतात म्हणून त्याना हलक्यात घेऊ नका असा इशारावजा सल्ला दिला आहे. एबीपी माझाने आयोजित केलेल्या माझं व्हिजन या कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते.

जयंत पाटील यांनी त्यांच्या मुलाखती दरम्यान राज्यात महाविकास आघाडीची २०२४ मध्ये सत्ता आली तर मविआचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील यांनी मु्ख्यमंत्री कोण असेल ते मविआ मधील तीन्ही पक्ष ठरवतील. ते ठरवण्याचा मला हक्क नसल्याचेही त्यांनी सांगितले.यानंतर त्यांनी याच मुद्दयावर भाजपकडे मोर्चा वळवला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, हा प्रश्न जर देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा होता. सुधीर मुनगंटीवार पुढचे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस याचं उत्तर दोघांनाही माहिती नाही असा टोला लगावला. त्यांनी समोर बसलेल्या मुनगंटीवारांना उद्देशून या प्रश्नाचं उत्तर एकाच व्यक्तीला माहिती आहे असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

पुढे बोलताना ते म्हणाले की, पूर्वी तशी परिस्थिती नव्हती, पूर्वी देवेंद्रच मुख्यमंत्री होणार असे म्हणायचे. या सगळ्यांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही.सगळी संख्याबळ हातात असतान, आता शपथ घ्यायची तेवढी राहीली असताना त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री केलं.

त्यांना इतक सोपं समजू नका. ते बोलतात, हसतात गोड. पण भाजपने त्यांना इतक हलक्यात घेऊ नये. ते कधी या सगळ्यांना पोहचवून येतील कळणार नाही. पण मी मुनगंटीवारांचा हितचिंतक आहे, पण ते फार आक्रमक होत नाहीत असे जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

Mumbai Goa Highway Traffic Jam Update : झाली दिवाळी! परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा....

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT