Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटातच नव्हे तर भाजपमध्येही प्रचंड नाराजी, जयंत पाटलांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष अद्याप संपलेला नसून उध्दव ठाकरे गट आणी आणि शिंदे गटातील संघर्ष न्यायालयात पोहचला आहे. लवकरच पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी होणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमिवर बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी मोठे वक्तव्य केलं आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बडानंतर शिवसेनेतील ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं, मात्र आता शिंदे गटामध्ये प्रचंड नाराजी असल्याचा दावा राष्ट्रवादीचे बडे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. जे मंत्री झाले त्यांना हवं ते खातं मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत, तर ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही तेही नाराज आहेत असे जयंत पाटील म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

राज्यातील सत्तासंघर्षावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अनेक जिल्ह्यात पालकमंत्रीपद नाहीये, खातेवाटपात मंत्रीपद वाटपात आमदार नाराज आहेत. आमदारांना मंत्री केलं नाही म्हणून मोठी नाराजी आहे. शिंदे गटात फार मोठी नाराजी आहे. उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपच्या गटात देवेंद्र फडणवीसांच्या सोबत असलेले नाराज आहेत, असे पाटील म्हणाले.

यापूर्वी बोलताना त्यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे देखील म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT