Jaykumar Gore Accident 
महाराष्ट्र बातम्या

Jaykumar Gore Accident : कठडा तोडून गाडी नदीपात्रात कोसळली; गोरेंच्या डोक्याला गंभीर दुखापत

सकाळ डिजिटल टीम

पुणे- भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात गोऱे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहे. गोरे यांच्यासह गाडीत चार लोक होते. त्यापैकी दोघांवर बारामती येथे उपचार सुरू आहेत. गोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. फलटनजवळ हा अपघात झाला. (MLA Jaykumar Gore Accident news in Marathi)

दरम्यान गोरे यांच्यावर रुबी हॉलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. पहाटे पावनेतीन वाजेच्या सुमारास गोरे आपल्या मतदारसंघाकडे निघाले होते. मात्र रस्त्यात काळाखाच्या ठिकाणी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात गाडी चौघेजण जखमी झाले आहे. जयकुमार गोरे हे मान खटावचे आमदार आहेत.

भीषण अपघातात गोरे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. काही वेळातच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील रुग्णालयात भेट देणार आहेत. तर आमदार राहुल कुल रुग्णालयात पोहोचले आहेत. गोरे यांच्या अपघातातनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली आहे. तर अनेकजण अपघातस्थळी पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT