Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: आव्हाडांकडूनही 'लाव रे तो व्हीडिओ'; तक्रारदार महिलेचा 'बहीण' म्हणून उल्लेख

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी एक व्हीडिओ सादर केला आहे. या व्हीडिओमध्ये सदरील तक्रारदार महिलेला उद्देशून आव्हाड यांनी 'बहीण' असा उल्लेख केला आहे. हा व्हीडिओ एका जाहीर कार्यक्रमातील आहे.

रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये कलम ३५४ या कायद्याची सविस्तर माहिती दिली. काल नेमकं काय घडलं त्याचाही घटनाक्रम सांगितला. अशा पद्धतीने एखाद्याला बदनाम करणं चुकीचं असल्याचं पाटील म्हणाले. शिवाय 'हर हर महादेव' चित्रपटाबाबत जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थ असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं.

''आम्ही विनयभंगाचं समर्थन कधीही करणार नाही. मात्र या घटनेमध्ये तसं काहीही झालेलं नाही. जितेंद्र आव्हाड यांनी सदरील महिलेला मुख्यमंत्र्यांच्या गाडीपासून केवळ दूर केलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून निर्णय घ्यावा'' अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni ruled out: महेंद्रसिंग धोनी दोन आठवड्यांसाठी IPL 2026 मधून बाहेर; CSK ला पहिल्या सामन्याआधी मोठा धक्का

Illegal Infant Disposal Case : आक्काताई लावत होती मृत अर्भकाची विल्हेवाट, नातेवाईकांनी नकार दिल्यास थेट उघड्यावर अर्भक फेकायचे; पेशंटचीही होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो रिक्षासाठी LPGचा पुरवठा कमी

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026 Marathi News: जसप्रीत बुमराह MI vs KKR सामन्यात नाही खेळणार? समोर आले मोठे अपडेट्स, CoE मध्ये झालेला दाखल

SCROLL FOR NEXT