Ajit Pawar Jitendra Awhad  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''असं असेल तर मी राजकारण सोडतो'' आव्हाडांनी अजित पवारांना खिंडीत गाठलं

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेऊन अजित पवार यांनी मोठं बंड केलं. ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झालेले आहेत.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी बोलावेल्या पहिल्या बैठकीत अनेकांनी थेट शरद पवारांवर आक्षेप घेतले. अजित पवारांनी तर शरद पवारांवर बोलतांना वयाचा मुद्दा उपस्थित करत कुठेतरी थांबलं पाहिजे, असं म्हटलं होतं. शिवाय वेळोवेळी भाजपशी कशी बोलणी केली, याचा पाढाच वाचला होता.

अजित पवारांनी बैठकीच्या दिवशी बोलतांना जितेंद्र आव्हाडांनाही टार्गेट केलेलं. गणेश नाईक यांच्यासह पक्षाचे अनेक मोठे नेते आव्हाडांमुळे पक्ष सोडून गेल्याचा आरोप त्यांनी घेतला होता. शिवाय आव्हाड आणि बोटावर मोजण्याइतकेच काही लोक शरद पवारांच्या जवळ असून ते ठरवतील तसंच होत असल्याचा अर्थ त्यांच्या बोलण्यातून निष्पन्न झाला.

त्याला उत्तर देतांना जितेंद्र आव्हाडांनी, राजकारण सोडण्याची भाषा केली होती. मी राजकारण सोडतो तुम्ही परत या, असं आव्हाड म्हणाले. अजित पवार आणि फुटून गेलेल्या एका गटाला एक प्रकारे खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरुय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी येवल्यात जाऊन शपथ घेईल. तुम्ही परत आल्यावर आयुष्यात कधीही राजकारणात येणार नाही. तुम्ही म्हणताय या बडव्यांनी साहेबांना घेरलंय, त्यांच्यामुळे सगळं झालंय. तर ठिक आहे मी पवार साहेबांच्या जवळपास दिसणार नाही. तेथे फिरकणारही नाही. मात्र तुम्ही परत या. शरद पवारांना या वयात त्रास देऊ नका, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT