Jitendra Awhad Criticise on Anna Hajare 
महाराष्ट्र बातम्या

जिंतेंद्र आव्हाड का म्हणतायेत अण्णा उठायची वेळ झाली?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (ता. 21) ज्येष्ठ समाजसेवक यांना ट्विट करून टोला लगावला आहे. अण्णा उठा कामाला लागावे लागेल, रामदेव बाबा तयार आहेत. उठा उठा सत्ता गेली. आंदोलनाची वेळ आली आहे, अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून आण्णा हजारे हे शांत झाले असल्याची टीका त्यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केले आहे. राज्यात मोठ्या सत्तापेचानंतर शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून सरकार स्थापन होण्याची वेळ आली आहे. अशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी हे सूचक ट्विट केले आहे. जितेंद्र आव्हाड हे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रिय असणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यातच त्यांनी आज ट्विटरवरून अण्णा हजारे यांना लक्ष केले आहे.

पुण्यातील टॉयलेट होणार 'बेस्ट'; महापालिकेची भन्नाट योजना

पाच वर्षापूर्वी जेव्हा काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात होते. तेव्हा अण्णा हजारे यांची अनेक आंदोलने गाजली होती. जंतर-मंतरवर आण्णांच्या आंदोलनाने देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम केले होते. त्यानंतर काँग्रेस आघाडीचे सरकार पायउतार होऊन भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर मात्र अण्णा हजारे यांनी कोणत्याही प्रकारचे लक्षणीय असे आंदोलन केलेले पाहायला मिळाले नाही. या पार्श्वभूमीवरच जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केली आहे.



सत्तास्थापनेच्या हालचालीमधील आजच्या घडामोडी; वाचायलाच हव्यात

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आज (ता.21) नवी दिल्ली येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवेसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT