Jitendra Awhad:
Jitendra Awhad: Esakal
महाराष्ट्र

Jitendra Awhad: मुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे...त्यांचंही नाव 'राम'! आव्हाडांचा भाजप नेत्यावर हल्लाबोल

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु राम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते राम कदम यावरुन आक्रमक झालेत. ते घाटकोपोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय. त्यांनी समस्त राम भक्तांची माफी मागावी. दरम्यान, आज जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजप नेते राम कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड म्हणाले, मी जे वक्तव्य केलं त्यावरून जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबाबत खेद व्यक्त करतो. यामुळे खूप लोकांचं मन दुखावलं आहे, मुलींना उचलून घेऊन जाणारी भाषा करणारे देखील मी केलेल्या वक्तव्यानंतर माझ्यावर तुटुन पडले आहे. त्यांचंही नाव 'राम'च आहे. मी त्यासाठी खेद व्यक्त करतो, असा टोला त्यांनी भाजप नेते राम कदम यांना लगावला आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. काल बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. पण, वाल्मिकी रामायणमध्ये हे लिहिलं आहे, असं म्हणत त्यांनी खुलासा केला आहे.

पुराणामध्ये हे लिहिलं आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. पण, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. आजकाल लोकांच्या भावना महत्त्वाच्या झाल्या आहेत. आमचा राम हृदयात आहे, तर त्यांचा राम बाजारात आहे. राम हा बहुजणांचा आहे. तो क्षत्रीय होतो. तो आमचा आहे, असं आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर बोलताना त्यांनी राम कदम यांना त्यांच्याच एका वक्तव्यवरून जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे.

रामयण वाचा, त्यात अयोध्या कांडमध्ये ५४ व्या ओवीमध्ये याचा उल्लेख आहे. पण, लोकांच्या भावनाचा आदर करुन मी खेद व्यक्त करतो आहे. माझ्याकडचे पुरावे वाचा. हे मी लिहिलेले नाहीत. मी जे बोलतो ते अभ्यास करुन बोलतो. खटल्यांना मी घाबरत नाही. राम कदमांनी रामायण किती वाचलंय माहिती नाही, मुली उचलणाऱ्यांनी मला शिकवू नये, असं म्हणत त्यांनी टीका केली.

रोहित पवारांवर काय म्हणाले आव्हाड?

जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आव्हाड म्हणाले, रोहित पवार लहान आहेत, त्यांच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. मी अभ्यासपूर्ण मांडली केली आहे. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT