Jitendra Awhad said, Mangeshkar family insulted Marathi people Jitendra Awhad said, Mangeshkar family insulted Marathi people
महाराष्ट्र बातम्या

जितेंद्र आव्हाड म्हणतात, मंगेशकर कुटुंबीयांनी मराठी माणसाचा अपमान केला

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत रविवारी (ता. २४) सायंकाळी लता मंगेशकर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. मात्र, या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. कारण, पुरस्कार वितरण समारंभाच्या पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव नव्हते. मंगेशकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न टाकून १२ कोटी मराठी माणसांचा अपमान केल्याची टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. (Jitendra Awhad said, Mangeshkar family insulted Marathi people)

मंगेशकर कुटुंबीयांमार्फत प्रत्येक वर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विविध क्षेत्रांतील मान्यवरांना कृतज्ञतापूर्वक पुरस्कार दिला जातो. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) दिला जाणार आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभ मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला.

या समारंभाला (Lata Mangeshkar Award Ceremony) विविध मान्यवर उपस्थित होते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. राज्यातील भाजप-शिवसेनेतील (BJP) वाढता वाद पाहता मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला न येण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. तसेच निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव नसल्याने त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे.

अशात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करून मंगेशकर कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. ‘लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे’ असे ट्विट त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT