Jitendra Awhad on Praful Patel Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Political Crisis: "अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर मृतांसह अल्पवयीन मुलांचीही नावं”; जितेंद्र आव्हाड संताप व्यक्त करत म्हणाले…

काल निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावावर दावा सांगितला आहे. हे प्रकरण सध्या निवडणूक आयोगाच्या आहे. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावर काल(९ नोव्हेंबर) निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये अजित पवार गटाकडून बनावट प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाच्या वकिलांकडून यावेळी करण्यात आला आहे. निवडणूक आयोगासमोरील सुनावणी पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी ‘एक्स’वर(ट्विटर) प्रतिक्रिया दिली आहे.

‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

"आज निवडणूक आयोगासमोर चिन्ह आणि पक्ष याबाबतच्या वादासंबंधी सुनावणी होती. फुटीर गटातर्फे जे अॅफिडेव्हीट देण्यात आलं होतं. त्या अॅफिडेव्हीटमध्ये जी काही प्रतिज्ञापत्र जोडली होती, त्याची चिरफाड अभिषेक मनुसंघवी या ज्येष्ठ वकिलांनी केली. त्यांनी त्या अॅफिडेव्हिटचे २४ भाग बनवले आणि त्याच्यामध्ये दाखवून दिलं की, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्र जोडली होती, वृद्धांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्य दाखवले होते."

"मृत व्यक्तींच्या नावाने प्रतिज्ञापत्र होती. एका प्रतिज्ञापत्रावर तर ‘हाऊस वाईफ’ असं नाव लिहिण्यात आलं होतं. काही ठिकाणी एकाचेच नाव तीन वेळा टाकण्यात आलं होतं. एकाच पत्त्यावर अनेक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आली होती. व्हेरिफिकेशन लातूरचं आणि प्रतिज्ञापत्र मुंबईचं, अशा प्रकरणात जवळ-जवळ २० हजार प्रतिज्ञापत्र ही खोटी सादर करण्यात आली आहेत, असं ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसंघवी यांनी निवडणूक आयोगाला पुराव्यासहीत दाखवून दिलं."

“फुटीर गटाचे वकील ज्येष्ठ विधीतज्ञ मुकुल रोहतगी यांनी खूप युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की, आताच्या क्षणाला याची गरजच नाही. परंतु, निवडणूक आयोगाने ऐकून घेण्याचा निर्णय घेतला. अभिषेक मनुसंघवी यांनी भारतीय संविधानाप्रमाणे प्रतिज्ञापत्रावर खोटं बोलणं, हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली,” असंही आव्हाडांनी पुढे म्हटलं आहे.

त्याचबरोबर, “यापुढे काय होईल? हे मला माहीत नाही. पण हे सगळं खोट आहे, खोट्याच्या आधारावर आहे, हे मात्र आज समोर आलं. जे खोट्याच्या आधारावर वागतात ते शेवटी खोटचं करतात, हे सिद्ध झालं. निवडणूक आयोग काय निकाल देईल? याबद्दल मला फार काही समजून घ्यायची इच्छा नाही. पण पुराव्यानिशी हे सिद्ध करण्यात आलं की, हे केलेलं सगळं खोट होतं. म्हणजे मी जे म्हणतोय तेच अधर्माविरुद्ध धर्माची लढाई.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT