Jitendra Awhad on sambhajiraje chhatrapati warning marathi movie makers over films on shivaji maharaj  
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: …ही परंपरा तर पुरंदरेंनीच सुरू केली; संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर आव्हाडांचं ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात ऐतिहासिक चित्रपटांवरून नवीन वाद पेटला असून संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शीत केलेला ‘वेडात वीर दौडले सात’या चित्रपटांवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत महाराष्ट्रात शिवाजी महराजांचा चुकीचा, खोटा इतिहास मांडण्याची परंपरा दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यानी सुरु केली, आता चित्रटसृष्टीतही तेच होत असल्याचे म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत शिवाजी महाराजांचा चुकीचा खोटा, इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी केल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा चुकीचा, खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे यांनी सुरु केली, जाणता राजा हे महानाट्य हे त्याचे एक रुप कारण त्यांचे लिखित पुस्तक होते. तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काही जण करत आहेत. आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे ह्यांच्या रुपाने एक आवाज मिळाला."

Jitendra Awhad tweet

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर यांचा ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला आहे.

संभाजी राजे यांनी चित्रपट निर्मात्यांना उद्देशून, सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते ठीक आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटाला हे चालू शकत नाही. हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास झाला. महाराजांकडे आपण अस्मिता आणि प्रेरणा म्हणून बघतो. सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काहीही इतिहास दाखवायचा का? असा प्रश्न उपस्थित केला.

चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहेत. पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? "वेडात मराठे वीर दौडले सात" काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी इतिहासाचा विपर्यास करणारे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे. माझी सूचना आहे की तुम्हाला ऐतिहासिक चित्रपट काढायचे आहे तर त्यासाठी ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे, अशी मागणी देखील संभाजी राजे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT