jitendra awhad
jitendra awhad sakal media
महाराष्ट्र

'त्या' विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा, पोस्टवर आव्हाड संतापले

सकाळ डिजिटल टीम

सातारा येथे भाषणात शरद पवार यांनी एक कविता वाचून दाखवली होती

मागील काही दिवसांपासून राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेवरून राजकीय गदारोळ सुरू आहे. शरद पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टोलेबाजी सुरु झाली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्दांत ट्वीट (Controversial Tweet) केलं आहे. यावरून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत तरुणाची वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांकडे सदर तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'काय पातळीवर हे सगळे होत आहे? या विकृत इसमाविरुद्ध कडक कारवाई करा,' असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे. सातारा येथे भाषणात शरद पवार यांनी एक कविता वाचून दाखवली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याप्रकरणी भाजपाने राष्ट्रवादीला धारेवर धरलं आहे. तर भाजपने अर्धवट व्हिडिओ शेअर करून दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

त्या तरुणाची वादग्रस्त पोस्ट आहे?

'बागलाणकर' नावाच्या ट्विटर हँडलवर आक्षेपार्ह मजकूर वापरत एक पोस्ट लिहिण्यात आली आहे. 'वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची...' असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांचा एक व्हिडिओ भाजपकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा बाप काढत अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पवार नेहमीच हिंदू धर्माची बदनामी करतात. जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते, असा निशाणा साधत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शरद पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

Elvish Yadav : रेव्ह पार्टीनंतर एल्वीश पुन्हा अडचणीत ; मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT