Jitendra Awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: 'NCPचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे', प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर आव्हाडांचं प्रत्युत्तर म्हणाले, 'लग्न एकाशी...'

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट शेअर करत शरद पवार यांच्यावर टीका केली होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी बंड केलं आणि राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार गटाकडुन शरद पवारांवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

यावरून मविआचे नेते नाराज झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट शेअर करत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी "लग्न एकाशी करायचे आणि हुंडा दुसऱ्याकडून घ्यायचा, ही सवय काहींना आहे", अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

'राष्ट्रवादीचं हे छुप राजकारण आहे. त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघेही कार्यक्रमाला उपस्थित होते. आम्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात समजू शकतो. कारण, त्यांचं राजकारण हे घड्याळाप्रमाणे आहे. घड्याळाला पेंडुलम असतो, तो कधी उजव्या आणि कधी डाव्या बाजूला जातो. तसेच, राष्ट्रवादीचे राजकारण काहीवेळा उजवीकडे, तर काहीवेळा डावीकडे असतं. सध्याची निवडणूक त्यांच्यासाठी उजवीकडची आहे,' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी ट्वीटरवर एक मीम शेअर करत शरद पवारांना लक्ष केलं होतं. 'जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या भिंगातून पाहता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ‘गोरमेंट आंटी’ अगदी बरोबर बोलली होती. तुम्हाला जर द्वेष, जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्याबरोबर जायचं असेल, तर खुशाल जावा. पण, तुम्ही पक्षफुटीचा स्टंट करून महाराष्ट्र आणि भारतातील जनतेला फसवू नका. शरद पवार हे नेहमीच दुतोंडी वागले आहेत. ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात,' असं प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: राज्य सरकारला मोठा झटका! ६७% ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून केवळ २७ प्रमाणपत्रांचं वाटप; सरसकट आरक्षण नाहीच, दिशाभूल कोण करतंय?

Video: बाबो...! सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? पती झहीर इक्बालने पापाराझींसमोर तिच्या पोटावर हात ठेवला आणि...

Nashik Post : आनंदाची बातमी! टपाल विभागाकडून आता कॅनडा, अमेरिकेतही पोचणार दिवाळी फराळ!

Latest Marathi News Live Update : नाशिक- पुणे महामार्गावरा एसटी बसला अपघात, १० प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT