jitendra awhad request raj thackeray to not make provoking political statements  Sakal
महाराष्ट्र बातम्या

"राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती, महाराष्ट्र पेटवू नका" - जितेंद्र आव्हाड

सकाळ डिजिटल टीम

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यात शिवाजी पार्क मैदानातील मेळाव्यात केलेल्या तुफान भाषणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टिका यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका” अशी विंनंती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना केली.

देशाची दोन वर्षांपासूनची कोरोनामुळे झालेली हालाखीची स्थिती, सोबतील वाढती महागाई यांची आठवण करुन देत आव्हाड यांनी राज ठाकरे यांना आवाहन केलं आहे. आव्हाड म्हणाले की, "राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका, कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय." यापुढे आव्हाड यांनी देशात वाढत असलेल्या इंधनाच्या किंमती व एकंदरीत महागाईची आठवण करुन दिली, त्यांनी "त्यांच्या खिशात पैसे नाहीयत. गॅस पेट्रोल डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत." असा टोला देखील राज ठाकरे यांना लगावला.

राज ठाकरे यांनी त्यांच्या गुढी पाडवा मेळाव्यात केलेल्या आक्रमक भाषणात त्यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्यावर देखील सडकून टिका केली. यासोबतच मुंबईत झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यावर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली. इतकेच नाही तर सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेशही दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT