Jitendra Awhad jayant patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता... जितेंद्र आव्हाड भावनिक

संतोष कानडे

मुंबईः मी सगळं मान्य करेन पण ३५४ (विनयभंग) मान्य करणार नाही. ३५४ आणि ३७६ यासाठी माझा जन्म नाही. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता पण हे मला सहन होत नाही, अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना आव्हाड म्हणाले की, माझ्यावरचा गुन्हा हा केवळ षड्यंत्राचाच भाग आहे. 'हर हर महादेव' चित्रपट प्रकरणात विनाकारण मला कोठडीत ठेवलं. कालचा हा प्रकार चुकीचा आहे. यापेक्षा राजकारणात न राहिलेलं बरं. मी सगळं सहन करेन परंतु ३५४चा गुन्हा सहन होत नाही. हे आपल्या काळजाला लागल्याचं आव्हाडांनी सांगितलं. यावेळी ते भावनिक झाले होते.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली. अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये कलम ३५४ या कायद्याची सविस्तर माहिती दिली. काल नेमकं काय घडलं त्याचाही घटनाक्रम सांगितला. अशा पद्धतीने एखाद्याला बदनाम करणं चुकीचं असल्याचं पाटील म्हणाले. शिवाय 'हर हर महादेव' चित्रपटाबाबत जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थ असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT